बुलढाणा दि. १२ जुलै :-
buldhana 2 children drawn जिल्ह्याच्या मानेगाव जवळ असलेल्या पूर्णा नदी पात्रात दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आहेप्रतीक वानखेडे १२कृष्णा भोपळे १४ असं मृत्यू झालेल्या मुलांची नाव असून दोघेही मुलं नांदुरा येथील रहिवाशी आहे ..
आज शाळेला सुट्टी असल्याने मृतक दोघे आणि त्यांचा मित्र पूर्णा नदीत पोहायला गेले होते. . मात्र दोघे जण नदी पात्रात अंघोळीसाठी उतरले असता त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही आणि ते दोघीही पाण्यात बुडाले ..तिसरा नदीच्या काठावर बसून होता ..
जवळपास कुणीही नसल्याने त्यांना वाचवण्यासाठी कुणीही आले नाही .. मात्र दोन तासांच्या नंतर शेतकरी जाताना दिसले असता त्यांना माहिती मिळाली , तेव्हा दोघांचे मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आले .. जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे .. या घटनेमुळे दोघांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे ..