Beed zpnews बीड जिल्हा परिषदेचे विद्यार्थी इसरो नासा ला भेट देणार -अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके.
Beed zpnews 50 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास जिजाऊ माँसाहेब पब्लिक स्कुल वासनवाडी येथे प्रारंभ
बीड ,प्रतिनिधी
Beed zpnews बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नासाची सहल घडवून आणणार असल्याचे जिल्हा परिषदेचेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले.
बीड तालुक्यातील वासनवाडी फाटा येथील जिजाऊ मासाहेब पब्लिक स्कूलबीड तालुक्यातील वासनवाडी येथील जिजाऊ मासाहेब पब्लिक स्कूल मध्ये आयोजित केलेल्या पन्नासाव्या विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ध्रुव फाउंडेशनचे सचिव बबनराव शिंदे हे होते.
यावेळी व्यासपीठावर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी ,जिजाऊ मासाहेब शिक्षण संस्थेच्या श्रीमती सुनीता शिंदे,बीडचे गटशिक्षण अधिकारी माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे भगवान सोनवणे,पब्लिक स्कूलचे प्राचार्य कांबळे,काझी उपशिक्षणाधिकारी (योजना) , विज्ञान पर्यवेक्षक दत्तात्रय लांडगे, लघुलेखक खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातून अकरा तालुक्यातील माध्यमिक गटामध्ये 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर प्राथमिक विभागातून 27 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये माध्यमिक शिक्षकांच्या विभागातून सहा शिक्षकांनी तर प्राथमिक शिक्षक यांच्या विभागातून चार शिक्षकांनी आणि एक प्रयोगशाळा परिचर यांनी या जिल्हास्तरीय प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे.
अतिरिक्त कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या हस्ते फित कापून आणि दीपप्रज्वलन करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आहे. त्यानंतर मान्यवरांनी सहभागी झालेल्या विज्ञान प्रयोगांची पाहणी करून माहिती घेतली.
व्यासपीठावरून बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके म्हणाले की आगामी 27 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील केंद्रस्तरावर स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाणार असून या परीक्षेतून तालुकास्तरीय परीक्षेसाठी विद्यार्थी निवडले जाणार आहेत.प्रत्येक तालुक्यातून तीन विद्यार्थी याप्रमाणे बीड जिलहयातील ३३ विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा येथील इसरोच्या स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी मिळणार आहे.याच तेहतीस विद्यार्थ्यांमधून अकरा विद्यार्थी निवडले जाणार असून या 11 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा येथील स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी मिळणार असल्याचे सोळंके यांनी सांगितले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ध्रुव फाउंडेशनचे सचिव बबनराव शिंदे यांनी सांगितले की माणसाच्या जीवनामध्ये विज्ञानाला महत्व महत्त्व आहे.विज्ञान हे माणसासाठी महत्त्वाचे असून माणसांसाठी लागणाऱ्या गरजा मधूनची निर्मिती होत असते.
त्यासाठी विज्ञानाला अध्यात्मिकतेची ही जोड असायला पाहिजे,असे त्यांनी यावेळी सांगितले.प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, मानवी मूल्य जपवण्यासाठी विज्ञानाचा वापर करायला हवा.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि दिनचर्येमध्ये विज्ञानाचे महत्त्व आहे.आणि त्याचा आपण नियमितपणे वापर करत असतो.असे सांगून मूल्य जपवण्यासाठी विज्ञानाचा वापर करायला हवा असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांनी केले.उपस्थितांचे आभार पब्लिक स्कूलचे प्राचार्य कांबळे यांनी मानले.