beed
beed shivsena news माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कोणताही संबंध राहिलेला नाही अशी घोषणा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख अनिल जगताप तसेच बीड जिल्हा beed shivsena संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील यांनी केली.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दोन दिवसापूर्वी बीड शहरातील विकास कामाच्या शुभारंभ हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृष्य प्रणाली द्वारे केला.
हा शुभारंभच्या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कुठलेही निमंत्रण नव्हते, शिवाय शिवसेनेच्या विविध आंदोलन, पक्षीय कार्यक्रमास वेळोवेळी निमंत्रण देऊनही ते उपस्थिती न राहिल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांची हकालपट्टी केली असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले, तर संपर्कप्रमुख पाटिल यांनी ज्या कार्यक्रमाचा क्षीरसागर यांनी शुभारंभ केला त्याचा निधी सह कामास मंजूरी उध्दव ठाकरे यांणी दिली.
क्षीरसागर हे अडचणीत असताना उध्दव ठाकरे यांनी त्यांना साथ दिली मात्र आज उध्दव ठाकरे हे अडचणीत असून क्षीरसागर यांनी शिवसेनेकडे पाठ फिरवली.
अलिकडच्या काळात पक्षश्रेष्ठींनी संपर्क साधूनही क्षीरसागरांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिवसेना आपल्या विचाराने आणि आपल्या ताकदीने बीड जिल्ह्यात वाटचाल करेल असे संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील सांगितले.
तर जिल्हाप्रमुख beed jilla shivsena pramukh अनिल जगताप यांनी क्षीरसागर यांची हकालपट्टी केल्याचे जाहिर केले.