बीड
beed science exhibition बीड तालुक्यातील वासनवाडी फाटा येथील जिजाऊ मासाहेब पब्लिक स्कूल बीड मध्ये पन्नासाव्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक प्राथमिक आणि शिक्षक गटातून जिल्ह्यातील 11 तालुक्यातून स्पर्धक आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
या विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ध्रुव फाउंडेशनचे सचिव बबनराव शिंदे हे होते.यावेळी व्यासपीठावर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे,जिजाऊ मासाहेब शिक्षण संस्थेच्या श्रीमती सुनीता शिंदे, उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे, उपशिक्षणाधिकारी हजारे, पब्लिक स्कूलचे प्राचार्य कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातून अकरा तालुक्यातील माध्यमिक गटामध्ये 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर प्राथमिक विभागातून 27 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये माध्यमिक शिक्षकांच्या विभागातून सहा शिक्षकांनी तर
प्राथमिक शिक्षक यांच्या विभागातून चार शिक्षकांनी आणि एक प्रयोगशाळा परिचर यांनी या जिल्हास्तरीय प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता.त्यापैकी माध्यमिक विभागातून तीन प्राथमिक विभागातून तीन शिक्षक विभागातून एक आणि प्रयोगशाळा परिचर यामधून एक असा निकाल घोषित करण्यात आला.
निकाल पुढील प्रमाणे
शिक्षक गटामध्ये प्राथमिक गटातून जोशी कमलाकर शिवाजीराव आकुबाई विद्यालय मांडखेल.
प्रयोगाचे नाव: गणित शैक्षणिक साहित्य.
माध्यमिक गटामध्ये अत्तम राठोड होळेश्वर विद्यालय होळ तालुका केज
प्रयोगाचे नाव ज्ञानपीठ विज्ञान पेटी
प्रयोगशाळा सहाय्यक गटामध्ये संत खंडोजी बाबा विद्यालय सैदापूर येथील प्रयोगशाळा सहाय्यक ससाने डीबी.
विद्यार्थी गटामध्ये प्राथमिक विभागातून सर्वेश कुलकर्णी,उदयराज शेळके प्राथमिक शाळा बीड
द्वितीय क्रमांक यशराज अनंत घुले खोलेश्वर माध्यमिक विद्यालय आंबेजोगाई
तृतीय क्रमांक शेख मोईन कलीम इमदादुल उलूम प्राथमिक शाळा परळी वैजनाथ
माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक समृद्धी किशोर वावरे पब्लिक स्कूल गेवराई
द्वितीय क्रमांक प्रतीक्षा दिलीप लांडगे , शिंदे प्रतीक्षा संतोष विवेकानंद विद्यामंदिर बीड
तृतीय क्रमांक थळकरी शिवशंकर रमेश युसुफ वडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते क्रमांक प्राप्त स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.