beed sangram gaurav gatha

योजना

मराठवाडा मुक्ती संग्राम गौरव गाथा चित्ररथ बीड जिल्ह्याच्या शंभर गावात फिरणार

By admin

September 17, 2023

 

बीड

beed sangram gaurav gatha मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरव गाथा सांगणारे 2 चित्ररथांना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथ रवाना केले. हे चित्ररथ बीड जिल्ह्यातील शंभर गावात फिरून मराठवाडा मुक्ती संग्राम गौरव गाथेची माहिती देतील.

पोलीस मुख्यालयातील मुख्य शासकीय कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. या चित्ररथांच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवगाथा सांगण्यात आली आहे. या चित्ररथांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी कृषिमंत्री श्री मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून याचा शुभारंभ केला.

याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी कृषिमंत्री श्री मुंडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.