Beed railway station

ताज्या बातम्या

Beed railway station रेल्वेने आष्टीचे नाव बदलले!

By admin

May 03, 2022

 

 

आष्टी,

 

Beed railway station नगर आष्टी रेल्वेला काही दिवसात सुरुवात होत आहे. या मार्गावरील स्थानकांचे नावे अपडेट करण्यात आले असून आष्टी येथील रेल्वे स्टेशनचे नाव बदलून नवीन आष्टी ठेवण्यात आले आहे. Beed latest news हे नाव रेल्वे स्टेशनला असणार आहे.

त्यामुळे आता आष्टी रेल्वे स्थानक नवीन आष्टी, नई आष्टी आणि New Ashti या नावाने ओळखले जाणार आहे.

Nagar beed parli railway नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील नगर ते  आष्टी पर्यंतचा  रेल्वे मार्ग पूर्ण झाला आहे. त्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया रेल्वे विभागाकडून पूर्ण करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आष्टी पर्यंतच्या सर्व स्थानकावरील तिकीट विक्रीचे ठेके देण्याची निविदा रेल्वे ने काढली आहे. या मार्गावर रेल्वे धावण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत घोषणाही केली आहे.  त्यामुळे या मार्गावर रेल्वे धावण्यास सुरुवात होणार कि नाही हे पुढे दिसेल.

Beed railway station : आष्टीचा चेहरा मोहरा बदलणार

गेल्या अनेक वर्षापासून Ahmednagar beed parli railwayline  या मार्गावर रेल्वे धावावी यासाठी भाजपचे दिवंगत मंत्री  गोपीनाथ मुंडे यांची इच्छा होती. तर यासाठी दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांनीही प्रयत्न केले होते. त्यांतर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांची सरकार स्थापन झाल्यानतर त्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला हातभार लावल्याने हा प्रकल्प आष्टी पर्यंत तयार झाला आहे.  तर पुढील मार्ग पुढे पुढे जात आहे. त्यामुळे आगामी काही वर्षात बीड beed railway पर्यंत आणि तेथून परळी पर्यंत जाईल.