ताज्या बातम्या

बीड  जिल्ह्यात सर्व पशुंचे बाजार सुरु करण्याच्या सूचना

By admin

December 04, 2023

बीड,

Beed pashudhan bajar बीड जिल्ह्यातील लम्पी चर्मरोग जनावरांमध्ये आढळून आल्याने व जलद गतीने पसरणारा संसर्गजन्य रोग असल्याने पशु बाजार बंद करण्यात आले होते. बीड जिल्हयातील 100 टक्के गोवर्गिय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसिकरण करण्यात आले आहे व लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. पशुबाजार बंद असल्यामुळे शेतक-यांना शेती विषयक व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कृषी पशुसंवर्धन व दुग्ध् व्यवसाय विकास विभागाच्या अधिसूचना 29 नोव्हेंबर 2022 नुसार जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा बीड यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सक्षम प्राधिकरणाने गोवर्गीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसिकरण केल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत बाळगण्याच्या अटीच्या अधिन राहून बीड जिल्हयातील सर्व पशुंचे बाजार सुरु करण्यास परवानगी दिल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा अपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिपा मुधोळ- मुंडे यांच्याकडून आलेल्य प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.