beed paithani swachhata reward

ताज्या बातम्या

पैठणी पाहिजे तर हे करा!

By admin

September 18, 2023

 

 

धारूर,

beed paithani swachhata reward बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आसरडोह येथील ग्रामपंचायतीने महिलांसाठी अनोखी स्पर्धा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जाहीर केली. एक महिनाभर सतत आपल्या घर आणि परिसरात स्वच्छता राखणाऱ्या महिलांना 5 पैठणी देण्यात येणार  असल्याची घोषणा आसरडोह च्या सरपंच मंगल आबासाहेब देशमुख यांनी केली.

या अनोख्या घोषणेची बीड जिल्ह्यात चर्चा होत आहे. गाव करी ते राव न करी असे म्हणतात ते यावरून सिद्ध होत आहे. मात्र याला गावातील महिला किती प्रतिसाद  देतात ते पुढे कळेल.

मराठवाडा मुक्ती संग्राम गौरव गाथा चित्ररथ बीड जिल्ह्याच्या शंभर गावात फिरणार

आसरडोह ग्रामपंचायत ने गौरी विसर्जन च्या दुसऱ्या दिवशी स्वच्छतेची स्पर्धा ठेवली आहे. गावातील ,तांडा,वस्ती वरील सर्व महिलांनी आपला घर ,परिसर रोज स्वच्छ करायचा आहे.एक महिना ज्या महिला आपापले घर व परिसर स्वच्छ करतील अशा ५ महिलांना पैठणी भेट देण्यात येणार असल्याचे त्यांनी ध्वजारोहण नंतर आयोजित बैठकीत सांगितले.

यावेळी सरपंच श्रीमती मंगल आबासाहेब देशमुख ,माजी सरपंच रवीकिरण आबासाहेब देशमुख ,ग्रामसेवक पाठक आर. डी. उपसरपंच सखू ज्ञानोबा पवार ,सदस्य गणेश गंगाधर पिंगळे ,माजी चेअरमन विष्णू दिगंबर शिंदे सदस्य  बालासाहेब साधू तरकसे सदस्य उमाकांत शिवाजी देशमुख ,सदस्य रेश्मा अमोल गायकवाड,सदस्य इंदुमती गुरुलिंग तोडकर ,सदस्य नितीन सुनील राठोड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.