beed news today

ताज्या बातम्या

photo अबब! गाराच गारा चोहीकडे

By admin

April 15, 2023

 

कडा

photo beed news today गारपिटीचा मोठा फटका आष्टी तालुक्यातील डोंगर पट्ट्यातील गावांना बसला आहे. आज झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आष्टी आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अरण विहीरा,पिंपळगाव घाट, देऊळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी या परिसरातील गावांना या गारपिटीचा तडाखा बसला आहे.

beed news update

सायंकाळी चार वाजण्याच्या नंतर या भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाउस सुरु होता. त्यातच गारांची beed hailstorm भर पडली. डोळ्या देखत पिकांचे नुकसान शेतकरी पाहत होते. या भागात कांदा या पिकाची मोठी लागवड केली जाते.

शेतकर्यांनी कांद्याची काढणी केली असली तरी त्याचे शेतात भुसार भरून ठेवल्याने या गारपिटीने मोठे नुकसान झाले. सर्वत्र गारांचा मोठा थर साचला होता.

beed news

या  अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे दौलवडगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये पिकांना फटका बसला. शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले. तर जनावरांसाठी तयार केलेल्या चाऱ्याचे नुकसान झाले.

beed hailstorm

या भागातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.