प्रादेशिक वृत्त

दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळी जेरबंद, आष्टी पोलिसांना अवॉर्ड जाहीर

By admin

August 14, 2023

 

आष्टी

Beed news crime दरोडा घालण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेल्या आरोपींना आष्टी पोलिसांनी घेराव घालत सिताफिने अटक केली. अनेक वर्षापासून वॉन्टेड असलेल्या आणि 37 गुन्हे दाखल असलेल्या अटल्या उर्फ अटल ईश्वर भोसले याच्यासह दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. आष्टी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक कुमार ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्यासह पथकाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यासंबंधीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

रात्री उशिरा शिराळ शिवारामध्ये काहीजण दरोडा घालण्याच्या उद्देशाने जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांनी आरसीपी प्लाटून ची मदत घेऊन शिराळ शिवारात असलेल्या या टोळीला घेराव घालून जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोघेजण फरार होण्यात यशस्वी झाले. तर कुख्यात दरोडेखोर अटल्या उर्फ अटल ईश्वर भोसले याच्यासह हुम्या उर्फ होमराज उद्धव काळे, युवराज उर्फ धोंड्या ईश्वर भोसले यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी झालेल्या झटापटीत या आरोपींनी पोलिसांवर सत्तूराने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या संदर्भात आष्टी पोलिसात वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडसह अहमदनगर, पुणे,सोलापुर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात चोरी,घरफोडी, खुनासह दरोडा,यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांना अनेक वर्षांपासून गुंगारा देत ताकतीच्या बळावर दहशत निर्माण करत फिरत होता.

कर्जत तालुक्यातील बेलगांव येथील रहिवाशी अटल्या ईश्वर भोसले वय वर्ष ३२ हा सराईत गुन्हेगार असून आष्टीसह अहमदनगर, पुणे,बीड,सोलापुर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा,यासह अनेक जिल्ह्यात घरफोडी,खुनासह दरोडा,जबरी घरफोडी, यात तो मास्टर माईट होता. मागील चार वर्षापासून तो पोलिसांना हवा होता. अंगाने आडदांड असलेला आटल्या ताकतीच्या जोरावर गंभीर स्वरूपाच्या घरफोड्या करायचा. या अगोदर त्याच्यावर दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.अल्पवयीन असल्याने त्याला पुणे येथील बालसुधारगृहात ठेवले होते.पण तिथून तो पळाला होता.आष्टीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सय्यद शौकतअली यांनी त्याला २०१८ साली श्रीगोंदा तालुक्यातुन जेरबंद केले होते.त्यानंतर काही दिवसांनी तो परत पसार झाला.

मागील चार वर्षापासून तो पोलिसांना सारखा गुंगारा देत असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. रविवारी रात्री ११ च्या दरम्यान आटल्या आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका ठिकाणी  दरोडा टाकण्याच्या  तयारीत आसल्याची  गोपनीय माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना मिळताच त्यांनी ठाण्यातील सहकारी सोबत घेऊन सापळा लावून रात्री उशिरा त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली.त्याच्यावर 37 गुन्हे दाखल असून 25 बीड जिल्ह्यात आहेत.त्यांच्याकडून देशी कट्टा,शार्प व्हेपण, घरफोडीची कटावणी, असा आणी इतर शस्त्रे जप्त केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख,पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे,पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, पो.हा. सुंबरे, पो.ना. दराडे , पोलिस ना प्रवीण क्षीरसागर, पो. ना. हनुमंत बांगर,पो. शि. मजहर सय्यद, दिपक भोजे, पो.शि. शेख, पो.शि.. गुंडाळे, पो.शि. गायकवाड,पो.शि.पवळ, वाहन चालक उदावंत,  दंगल नियंत्रण पथकातील जवान,याच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.आष्टी पोलिसांच्या कामागिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.