ताज्या बातम्या

धोंडा खाल्ला अणि जीव गेला!

By admin

June 09, 2026

माजलंगाव,

Beed news Cat eats gold ring बातमी आहे धोंड्याची, म्हणजेच अधिक मास याला पुरुषोत्तम मास असेही म्हंटले जाते. या महिन्यात जावयाला धोंडा खायला बोलवितात. त्याचा सन्मान करतात, त्याला गोडधोड खायला घालतात,त्यांना पाची पोषाख करतात अणि पाठवणी करतात.

दर तीन वर्षाने  अधिकमास येतो.यंदा हा अधिक मास 15 जून पर्यंत असणार आहे.त्यासाठी गावागावात जावयाची गर्दी दिसत आहे.मुली माहेरपणाला आल्या आहेत. सासरे आपल्या जावयाची खिदमत करत आहेत. जावयाला सरप्राईज देण्याचा प्रयत्नात चक्क एका मांजरीला जीव गमवावा लागला.

किस्सा असा घडला की, बीड जिल्ह्यातील माजलंगाव जवळील एका वस्तीवर हा किस्सा घडला.जावयाला सोन्याची अंगठी द्यायची त्याची मस्करी करून. जेवणासाठी केलेल्या धोंड्यात ही पाच ग्राम  सोन्याची अंगठी लपवून ठेवली.

जावयाला सरप्राईज द्यायचे असल्याने ही अंगठी धोंड्यात ठेवली.जेवणावळीच्या गडबडीत स्वयंपाक घरातील मांजराने नेमका हाच धोंडा खाल्ला. सर्व धोंडे शोधले पण अंगठी मिळालीच नाही.

जावयाला मान द्यायचा राहून गेला.अंगठी गेली कुठे याचा शोध घेतल्यानंतर मांजराने धोंडा खाल्ल्याच लक्षात आले.

त्यासाठी मांजराला चार दिवस खोलीत कोंडून ठेवण्यात आले.तिच्या विष्ठातून अंगठी बाहेर पडेल, पण ते झाले नाही.या मांजरीला उलट्या होण्याचे औषध देण्यात आले.

पण त्यामुळेही अंगठी बाहेर पडलीच नाही, यामधे मात्र मांजराचा जीव गेला.त्यानंतर मांजरीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून काढण्यात आली.धोंडा जावयाला, गम्मत सासूबाईंची अणि जीव गेला मांजराचा.यात अधिक मासा निमित्ताने पुण्य मिळाले की पाप तुम्हीच ठरवा.