बीड
beed news भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक तथा मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव गणेश आजबे यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की राजे यशवंतराव होळकर जयंतीनिमित्त जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या व्यक्तींचा ‘यशवंत रत्न’ आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना “राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” देवून गौरव करते.
यावर्षीचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांनी गणेश आजबे यांची निवड केली आहे. श्री गणेश आजबे गेली एकोणीस वर्षे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक शास्त्राचे तज्ञ शिक्षक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आहे. स्काऊट गाईड चळवळीत ते सक्रीय असतात.
त्यांच्या मार्गदर्शनाने भालचंद्र विद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. विनायक भाऊ आजबे प्रतिष्ठान वाघीराच्या माध्यमातून गणेश आजबे रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, गरीब आणि होतकरू विद्यार्थींना शालेय साहित्य वाटप असे अनेक उपक्रम राबवतात.
ते स्वत: दरवर्षी रक्तदान करत असतात. मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून गेली सोळा वर्षे ते शिक्षक चळवळीत कार्यरत असून जिल्हा सचिव म्हणून काम करत आहेत. राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल भालचंद्र शिक्षण संस्थेचे सचिव दीपक घुमरे, मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम, माजी अध्यक्ष डी.जी.तांदळे, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, विनायकराव माध्यमिक विद्यालय वैद्यकीन्ही चे सचिव भागवतराव आजबे भालचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन सावंत, पर्यवेक्षक अंगद हावळे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.