ताज्या बातम्या

Beed minor gang rape अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार होताना महिलेने काढले मोबाईल फोटो

By admin

December 19, 2022

Beed minor gang rape अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार होताना महिलेने काढले मोबाईल फोटो

माजलगाव

Beed minor gang rape तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जालना जिल्ह्यातून सालगडी म्हणून कामासाठी आलेल्या सालगड्याच्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी अत्याचार करण्याची अमानुष घटना रविवार दिनांक 18/12/2022 रोजी उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एक शेतसालगडी दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील एका शेतकऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून आपल्या कुटुंबासह राहात आहे .नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी आई वडील दोघेही शेतात कामासाठी गेले असताना यावेळी घरात मुलगी एकटीच असल्याची संधी साधून बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळ यां नराधमाने त्याअल्पवयीन मुलीस उसाच्या शेतात ओढत नेले .त्या ठिकाणी विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या नराधमांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केले.आणि विशेष म्हणजे ही माणुसकीला काळीमा फासणारीअमानुष घटना घडत असताना एक महिला उपस्थित होती.या महिलेने त्या अल्पवयीन मुलीला वाचवण्या ऐवजी किंवा तिला सोडवण्या ऐवजी तिचे मोबाईल मध्ये त्या प्रसंगाचे नग्न फोटो घेण्यात मग्न होती. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात या पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या नराधम आरोपी पैकी तिघा आरोपींना त्यांच्या मुस्क्या आवळीतअटक केली असून याप्रकरणी या पीडित मुलीच्या तक्रारीवरून या महिलेसह पाच जणांवर बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अँट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दिंद्रुड पोलीस स्टेशनला पोलीस उपविभागीय अधिकारी आयपीएस डॉ. धीरज कुमार बच्चू यांनी भेट देत आरोपी विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ व अक्षय अर्जुन फपाळ या तीन आरोपींना तात्काळ जेरबंद केले. सदर कारवाई दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, युवराज श्रीडोळे, विशाल मुजमुले, मुकेश शेळके, रेवण दुधाने आदींनी केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास डॉ धीरजकुमार बच्चू करत आहेत.