ताज्या बातम्या

बीड जिल्ह्यात दिग्गजांचे मतदान सर्वाधिक मतदान केज मध्ये

By admin

May 13, 2024

Beed loksabha voting बीड जिल्ह्यात दिग्गजांचे मतदान सर्वाधिक मतदान केज मध्ये

बीड

Beed loksabha voting लोकसभा 39 मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारपंकजा मुंडे यांनी आपल्यामूळ गावीे नाथरा तालुका परळी येथेआपल्या कुटुंबासमवेत मतदान केले.यावेळी त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे,आई प्रज्ञा मुंडे,तसेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही समवेत मतदान केले.

पंकजा मुंडे यांचे त्यांच्या कुटुंबीयांनी घरी औक्षण केल्यानंतर त्यांनी परळी येथील वैद्यनाथाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी गोपीनाथ गड येथे जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या नाथरा या गावी मतदान केले.

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे आपलाआपल्या केज मतदार संघातील मूळ गावी आनंदगाव सारणी येथे मतदान केले.

जिल्ह्यामध्ये सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर या मतदारांनी सकाळपासून जोर धरला. सकाळी 11 वाजेपर्यंत बीड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण टक्केवारी 16.62 इतकी होती. अकरा वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान केज विधान सभा मतदार संघामध्ये 21.55% इतके झाले. तर सर्वात कमी मतदान विधानसभा मतदार संघात झाली 10.95% इतकं प्रमाण होते. गेवराई मतदार संघामध्ये 17.31% मतदारसंघांमध्ये 17.20% विधानसभा मतदारसंघांमध्ये 14.20% परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये 18. 77 इतके मतदान झाले.