आष्टी (प्रतिनिधी)
beed loksabha pankaja munde prachar by suresh dhas सन २०१४-२०१९ या भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीच्या शासनामध्ये पंकजाताईसाहेब मुंडे या ग्रामविकास मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वात जास्त निधी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनीच आणलेला आहे..
मराठा आरक्षण प्रश्नामुळे समाज मन एकत्रित आलेले आहे आणि राज्य शासनाने दिलेले मराठा आरक्षण हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणारे असेल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी दिलेले असल्यामुळे.. सामाजिक भान राखून सर्व जबाबदार कार्यकर्त्यांनी गावातील प्रमुखांनी जनतेपर्यंत जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती द्यावी आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार beed loksabha bjp candidate राष्ट्रीय सचिव पंकजाताई साहेब मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठवावे असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले .
गावबंदीचे बोर्ड हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बीड लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी धामणगाव जिल्हा परिषद गट व मुर्शदपुर गटातील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सेवा सोसायटीचे चेअरमन यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते..
ते पुढे म्हणाले.. पंकजाताई मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना स्वातंत्र्यापासून सर्वात जास्त निधी त्यांनी बीड जिल्ह्यासाठी दिला असून वाड्यावर,वसत्यांवर.. तांड्यापर्यंत च्या ठिकाणी पक्के रस्ते तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे.. तसेच अहमदनगर बीड रेल्वे मार्गासाठी राज्य आणि केंद्र शासनाचा निधी त्यांच्यामुळेच मिळालेला असून अहमदनगर ते अमळनेर पर्यंत रेल्वे धावली आहे तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण मार्ग, ग्राम विकास विभाग अंतर्गत ग्रामीण मार्ग मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालेले आहेत असे सांगत.. सद्यस्थितीमध्ये मराठा आरक्षणामुळे समाजामध्ये अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत..
मात्र देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले होते परंतु त्यानंतर सत्ता बदल होऊन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हे आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत टिकले नाही..
मात्र सध्याच्या राज्य शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या आणि मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक १० टक्के आरक्षण मंजूर केले आहे तसेच सगे सोयऱ्यांच्या बाबतही हे सरकार सकारात्मक असून हरकतीच्या पडताळणी नंतर त्या बाबतीत निर्णय होणार आहे..
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सकारात्मक रीतीने मागासवर्गीय आयोगाकडे माहिती सादर केलेली आहे त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारे आहे असा विश्वास सर्वांनाच वाटत आहे असे असताना मात्र मराठा समाजाच्या मूक मोर्चांना “मुका मोर्चा “अशी टिंगल महाविकास आघाडीतील काही नेते करत होते..
मात्र ज्या नेतृत्वाने मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण दिले आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला अशा माणसाची जात काढून त्याला बदनाम करण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे.. इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्व सवलती या आरक्षणामुळे मिळत असून या शासनाने शैक्षणिक धोरणामध्ये देखील बदल करून शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व समाजातील मुलींची शैक्षणिक फीस राज्य शासन भरणार आहे.. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांनी या सर्व बाबी समाजामध्ये जाऊन समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.. आपले राजकीय विरोधक समाजामध्ये सामाजिक दुहेरी पसरवण्याचे काम करत असून चुकीचे बोलत असतील.. सामाजिक समतोल बिघडवण्याचे काम करत असतील.. तर त्यांना गावोगावातील प्रमुख मंडळींनी जागेवर चोख उत्तर द्यावे..
आपण सर्वजण दररोज जनतेच्या सुखा दुखात सहभागी आहोत.. त्यामुळे जो कार्यकर्ता दररोज सुखदुःखात सहभागी असतो त्याचेच मतदार ऐकत असतात.ज्या राजकीय पक्षाने मराठा समाजाला सत्ता असताना आरक्षणासाठी विरोध केला. त्या लोकांना आता मराठा आरक्षणाचा पुळका आलेला असला तरी मतदार राजा सुज्ञ आहे त्यांना सर्व इतिहास ठाऊक आहे. त्यामुळे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षांच्या महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव पंकजाताई साहेब मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठवण्यासाठी प्रयत्नांची परकाष्टा करावी असे आवाहनही त्यांनी शेवटी केले..
यावेळी धामणगाव येथे माजी सभापती छत्रगुण मरकड,संजय गाढवे, विस्तारक हरिष खाडे,माजी सरपंच अशोक गर्जे,एन.टी. गर्जे, डॉ.युवराज तरटे,सरपंच नंदकिशोर करांडे,शहादेव वणवे,संपत ढोबळे, धनंजय तरटे,कल्याण काकडे,सरपंच मनोज गाढवे,सुंदरलाल गर्जे तर आष्टी येथील बैठकीस युवानेते जयदत्त धस,आदिनाथ सानप,अरुण भैय्या निकाळजे, विस्तारक हरिष खाडे,गणेश शिंदे,रंगनाथ धोंडे,आत्माराम फुंदे,खंडू दादा जाधव,सरपंच सुधीर पठाडे,सरपंच अशोक मुळे,शांतीलाल भोसले,दीपक निकाळजे, अशोक पवार,किशोर झरेकर,शैलेश सहस्त्रबुद्धे,सुनील रेडेकर,बन्सी पोकळे,भारत मुरकुटे,सरपंच तात्यासाहेब शिंदे,संजय पोकळे,अमृत पोकळे,माजी सरपंच अतुल कोठुळे,सरपंच परिवंत गायकवाड,नवनाथ नागरगोजे,सरपंच हिराभाऊ केरुळकर, माजी सरपंच बबन शेकडे,भरत जाधव,नगरसेवक अक्षय धोंडे उपस्थित होते.