bajarang sonawane

ताज्या बातम्या

विकासनिधी वापस जाऊ देणाऱ्यांना मते मागण्याचा अधिकार नाही

By admin

April 13, 2024

Beed loksabha nivadnuk 2024 विकासनिधी वापस जाऊ देणाऱ्यांना मते मागण्याचा अधिकार नाही – बजरंग सोनवणे

Pagoda,

Beed loksabha nivadnuk 2024 मते मागायलाही ज्या आल्या नाहीत ज्यांनी विकासासाठी आलेला निधी देखील खर्च केला नाही . तो सर्वसामान्यांच्या हक्काचा निधी नाकर्तेपणामुळे वापस गेला याला कारणीभूत असणाऱ्यांना आता आपल्या बहिणीसाठी देखील मते मागण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तथा महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केला

पाटोदा तालुक्यातील गावांमध्ये गावभेट व मतदारांशी संवादा दरम्यान घुमरे पारगाव येथे ते बोलत होते . यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार साहेबराव नाना दरेकर, किशोर नाना हंबर्डे, पूजाताई मोरे, ॲड. जाधव, मुकुंद शिंदे, आष्टी विधानसभा प्रमुख रामभाऊ खाडे, परमेश्वर शेळके, आपचे डॉ महेश नाथ, अशोक येडे, उद्धव दरेकर, काँग्रेसचे रविदादा ढोबळे, नगरसेवक भाऊसाहेब गुंड, बालासाहेब जाधव, सचिन वारूळे, ऋषी दरेकर,डॉ चौधरी, सचिन अरुण, विष्णू घोलप, बालासाहेब मिसाळ हे होते.

पुढे बोलताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले कि ; ज्यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतीमालाला भाव मिळावा म्हणून मोर्चे काढले आंदोलने केली त्यांना मात्र केंद्रात आणि राज्यात सरकार येताच विसर पडला देशात पेट्रोल डिझेल गॅस याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत महागाई प्रचंड वाढलेली आहे खते, बी बियाण्यांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. मात्र सोयाबीन, कापूस कांदा यांचे भाव पडलेले असून मातीमोल भावाने त्याची विक्री करावी लागत आहेत. याचाही जाब भाजप उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना विचारायला हवा. असे परखड मत बजरंग सोनवणे यांनी पाटोदा तालुक्यातील गावांना दिलेल्या भेटी दरम्यान व्यक्त केले

पाटोदा तालुक्यातील वाघिरा फाटा, वाघीरा आणि वैद्यकिन्ही, वैजाळा पाचेगाव, पाचंग्री, मंझरी, अनपटवाडी, ढाळेवाडी, पाटोदा आणि धनगर जवळका, पारनेर, गवळ वाडी, कुसळंब, सुपा, सावरगाव घाट, मुगगाव याठिकाणी भेटी देवून त्यांच्याशी संवाद साधला.