राज-का-रण

14 वर्षे खासदार न पाहिलेल्या गावात बजरंग सोनवणे यांच्या बैठका

By admin

April 12, 2024

beed loksabha ncp bajarang sonavane 14 वर्षे खासदार न पाहिलेल्या गावात बजरंग सोनवणे यांच्या बैठका

आष्टी

beed loksabha ncp bajarang sonavane बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आष्टी तालुक्यातील  14 वर्ष खासदार न पाहिलेल्या गावांना भेट देऊन नागरिकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

 

बजरंग सोनवणे यांनी आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर, पिंपळा, सुंबेवाडी, ठोंबळ सांगवी , हातोळन पारोडी, वाहिरा, या भागात आपला संपर्क  बैठका घेतल्या. हरीनारायण आष्टा येथे उमेदवार बजरंग सोनवणे यांची बैलगाडीतून् मिरवणूक काढण्यात आली.

सोनवणे यांनी या भागाचा दौरा केला. या भागात अदयाप 14 वर्षात एकही खासदार आला नसल्याचे  नागरिकांनी सांगितले. पारोडी येथील मंदिर बैठकीत नागरिकांनी आपल्या भावना सोनवणे यांच्या समोर मांडल्या.

यावेळी नागरिकांनी सांगितले की, गेल्या 14  वर्षात खासदार एकदाही आले नाहीत. या भागातील 32 गावांना अद्याप पर्यंत खासदार निधी कसा असतो ? माहित नसल्याचे सांगितले.

पारोडी हे गाव कांदा उत्पादक गाव असल्याने नागरिकांनी कांद्याच्या समस्या मांडल्या. यावेळी सोनवणे यांनी खासदारांनी कांद्याच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवायला पाहिजे होता. या खासदारांनी आपला निधी सुद्धा खर्च केला नसल्याचे सांगून हे सरकार सरकार विरोधी असल्याचे सांगितले.