Beed loksabha election Karuna munde

प्रादेशिक वृत्त

करुणा शर्मा – मुंडे बीडमधून लोकसभा निवडणूक लढविणार

By admin

April 17, 2024

 

Beed loksabha election Karuna munde बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे लढत होणार

बीड,

Beed loksabha election Karuna munde लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तसा राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणाऱ्या त्यांच्या पत्नी करुणा शर्मा – मुंडे पुन्हा मैदानात उतरल्या आहेत.

नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया गुरुवार दिनांक 18 एप्रिल पासून

आगामी लोकसभा निवडणुकीत बीडमधून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली. असून २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. त्यामुळे बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे लढत होणार आहे.