beed loksabha election highest voting

ताज्या बातम्या

मतदानात बीडने राज्यात बाजी मारली!

By admin

May 14, 2024

बीड

beed loksabha election highest voting राज्यातील 11 लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडली. चौथ्या टप्प्यात झालेल्या या निवडणुकीमध्ये अहमदनगर औरंगाबाद बीड जळगाव जालना मावळ नंदुरबार पुणे रावेर शिर्डी शिरूर या मतदारसंघाचा समावेश होता.

राज्यातील या सर्व मतदार संघामध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी बीड जिल्ह्यामध्ये 70.92 % इतकी पहावयास मिळाली ही टक्केवारी राज्यातील या टप्प्यात झालेल्या मतदार संघाच्या तुलनेत सर्वाधिक पहावयास मिळाली. सर्वात कमी मतदान पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये 51.21  टक्के इतके झाले.

राज्यात या टप्प्यात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात काट्याची टक्कर झाली.

बीड लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता  मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वाजेपर्यंत प्राथमिक उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे 70.92 % टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

या यामध्ये आष्टी 74.79 %, बीड66.09%, गेवराई 71.43%, केज 70.31%., माजलगाव 71.61%, परळी 71.31% विधानसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता.

बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 15 आदर्श मतदान केंद्र होते. यामध्ये 288-गेवराई 2, 239-माजलगाव -2, 230- बीड -2 231-आष्टी -5, 232-केज -4 व 233 परळी -1 हे होते.

  दिव्यांग, महिला, नव मतदार, तृतीयपंथी  सर्वांनी उत्साहपूर्णपणे मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 11 दिव्यांग मतदान केंद्र होते, 55 महिला मतदान केंद्र, 316 परदानशी केंद्र होती.

 मतदानाच्या सुरुवातीला 26 मतदान केंद्रावर मशीन बदलण्यात आले. 8 कंट्रोल युनिट तांत्रिक अडचणीमुळे बदलण्यात आले.18 व्हीव्हीपट मशीन बदलण्यात आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर या मतदारांनी सकाळपासून जोर धरला. सकाळी 11 वाजेपर्यंत बीड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण टक्केवारी 16.62 इतकी होती. अकरा वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान सभा मतदार संघामध्ये 21.55% इतके झाले. तर सर्वात कमी मतदान विधानसभा मतदार संघात झाली 10.95% इतकं प्रमाण होते. गेवराई मतदार संघामध्ये 17.31% मतदारसंघांमध्ये 17.20% विधानसभा मतदारसंघांमध्ये 14.20% परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये 18. 77 इतके मतदान झाले.