beed loksabha BJP will investigate the defeat of Pankaja Munde

ताज्या बातम्या

पंकजा मुंडे यांच्या पराभवाची भाजप करणार चौकशी 

By admin

June 16, 2024

मुंबई , 

beed loksabha BJP will investigate the defeat of Pankaja Munde पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. त्यांच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.महायुतीला पराभव पत्करावा लागलेल्या 33 मतदारसंघासाठी भाजपने या  निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.विशेष म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पराभव झालेल्या सुजय विखे यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे हे नांदेड लोकसभेच्या पराभवाचे कारणे शोधणार आणि नगरची कारणे दुसरे शोधणार.

महायुतीला पराभव पत्करावा लागलेल्या 33 मतदारसंघासाठी भाजपने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच ज्या १७ मतदारसंघांमध्ये महायुती विजयी झाली तेथेही निरीक्षक पाठविण्यात येणार आहेत. सर्वांना २२ जूनच्या आत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

बीड लोकसभेमध्ये पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारण मीमांसा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर करणार आहेत.भाजपने २८ जागा लढविल्या होत्या पण प्रदेश भाजपने शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या वाट्याला गेलेल्या मतदारसंघांमधील जय- पराजयाची कारणे शोधून काढण्याचे ठरविले आहे. विधानसभा निवडणुकीचा तिन्ही पक्ष म्हणून एकत्रितपणे विचार करताना हे अहवाल महत्त्वाचे ठरतील.

रामटेक – खा. अनिल बोंडे, अमरावती आशिष देशमुख, वर्धा – आ. प्रवीण दटके, भंडारा-गोंदिया रणजीत पाटील, यवतमाळ-वाशिम – आ. आकाश फुंडकर, दिंडोरी विजयाताई रहाटकर, हिंगोली- आ. संजय कुटे, उत्तर-पश्चिम मुंबई – सुनील कर्जतकर, दक्षिण मुंबई – माधवी नाईक, उत्तर-मध्य मुंबई- हर्षवर्धन पाटील, उत्तर-पूर्व मुंबई – आ. राणा जगजितसिंह, मावळ – आ. प्रवीण दरेकर, अहमदनगर – खा. मेधा कुलकर्णी, माढा – आ. अमित साटम, भिवंडी गोपाळ शेट्टी.