विशेष वृत्त

Beed ganesh festival application सार्वजनिक गणेशोत्सव 2022 साठी परवाना कसा मिळवावा

By admin

August 20, 2022

 

आष्टी Beed Ganesh festival application  सार्वजनिक गणेशोत्सव 2022 या वर्षी कुठल्याही निर्बंधाशिवाय साजरा केला जाणार आहे.मात्र त्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.परवानगीसाठी पोलीस विभागाने खास पोर्टलची निर्मिती केली आहे.सार्वजनिक गणेश मंडळाची सोय व्हावी यासाठी आणि सोप्या पद्धतीने परवाना मिळावा यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी हे तयार करण्यात आले आहे. आष्टी तालुक्यातील गणेश मंडळांनी या सेवेचा माध्यमातून गणेशोत्सव परवाना घेण्यासाठी अर्ज करावे असे आवाहन आष्टीचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी केले आहे.

 

त्या त्या मंडळांनी स्थानिक पोलीस प्रशासना कडे ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव 2022 परवाना काढणे साठी आवश्यक असलेली कागदपत्रे १) अध्यक्ष यांचा फोटो २) आधार कार्ड ३) जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र ४) धर्मादाय आयुक्त नोंदणी हे सर्व स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.

Beed Ganesh festival application  सार्वजनिक गणेशोत्सव 2022 परवाना कसा मिळवावा ?

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

परवाना अर्ज

सुरुवातीला वरील परवाना अर्ज वर क्लिक केल्यानंतर समोर पोलीस पोर्टल ओपन होईल. त्यानंतर समोर विविध ऑप्शन दिसतील त्यातील online services या ऑप्शन वर क्लिक करावं . त्यानंतर त्यातील खाली दिसणाऱ्या विविध सेवांपैकी Ganesh festival permission Application हे ऑप्शन निवडावे. त्यांनतर समोर तुम्हाला Login id तयार करण्यासाठी विंडो दिसेल त्यामध्ये नवीन create citizen login वर क्लिक करून नवीन लॉगिन आयडी तयार करावे.

तुमच्या नवीन लॉगिन आयडी तयार केल्यानंतर त्यामध्ये login करावे . लॉगिन झाल्यावर त्यातील नागरिकांच्या सेवा या पर्यायावर क्लिक करून सार्वजनिक गणेशोत्सव परवानगी अर्ज वर क्लिक केल्यानंतर समोर अर्जाचा विंडो तयार दिसेल. त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला वरील 4 कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत .ते केल्यानंतर अर्ज सबमिट करावा म्हणजे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. अर्जातील चुका टाळण्यासाठी अर्ज वाचून मगच भरावा.