beed cyber news

ताज्या बातम्या

beed cyber news निवृत्त सैनिकाचे 15000 रुपये परत मिळवले

By admin

January 15, 2023

निवृत्त सैनिकाचे 15000 रुपये परत मिळवले – सायबर पोलीस ठाणेची तत्परता

 

बीड

beed cyber news  फोन पे च्या माध्यमातून चुकून दुसऱ्या व्यक्तीला गेलेल्या व्यक्तीकडून पैसे परत मिळविण्यात बीड सायबर सेलला यश मिळाले आहे. ही रक्कम संबंधित व्यक्तीला देण्यात आल्याची माहिती beed सायबर सेल चे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी दिली.सायबर सेलच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

धानोरा, ता आष्टी येथील  मेहबूब दगडूभाई पठाण या निवृत्त सैनिकाचे नजरचुकीने 15000 रुपये  अन्य त्याचे मित्राचे अकाउंट वर फोन पे द्वारे पैसे पाठवत असताना, दुसऱ्या अन्य अज्ञात व्यक्तीस पाठवले गेले होते.

केवळ एक नंबर चुकीचा टाईप झाल्याने सदरील रक्कम नांदेड येथील एक युवक चे अकाउंट वर गेली होती. ज्यास पैसे पाठवायचे होते त्यास गेलेच नाही हे लक्षात आल्यावर काल दिनांक 14-1-23 रोजी त्यांनी तक्रार सायबर पोलीस ठाणे येथे केली होती.

सायबर पोलीस ठाणे मार्फत याचा शोध घेण्यात आला होता आणि उचित कार्यवाही करून पुन्हा पीडित चे अकाऊंट वर कालच ही रक्कम पुन्हा वळते करण्यात आली आहे. पोलिसांचे कामगिरीवर तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सायबर पोलीस ठाणे चे पोलिस जमादार शेख आसेफ यांनी अतिशय तत्परतेने ही कामगिरी केली आहे. नागरिकांनी आपल्या झाल्या फसवणूकची किंवा गफलतीची तक्रार ताबडतोब केल्यास अशा प्रकरणात काम करण्यास सोपे जाते.

फोन पे किंवा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे पैसे पाठवत असताना योग्य व्यक्तीस पैसे पाठवत आहोत काय याची नाव आणि नंबर या दोन्हींची खात्री करूनच पैसे पाठवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

तसेच क्रेडिट कार्ड बाबत भीती घालून किंवा अन्य काही आमिष दाखऊन क्रेडिट कार्ड ची माहिती धारकांच्या साधेपणाचे फायदा घेऊन क्रेडिट कार्ड धारक यांचे मार्फत मिळवली जाते आणि मग धारकांच्या न कळत त्यावर खरेदीही केली जाते असे फ्रॉडही होत आहे.

सर्वच कार्डधारकानी आपली कार्ड ची माहिती अनोळखी लोकांस देऊ नये. काही तक्रार करायची झाल्यास कार्डचे पाठीमागे लिहलेल्या कस्टमर केअर ल च करावी अन्य कोठेही फोनवरून करू नये, असेही आवाहन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, तसेच अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे वतीने करण्यात येत आहे.