ताज्या बातम्या

Beed crime news आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

By admin

May 19, 2022

आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

आष्टी

Beed crime news  आरोपींचा शोध घेण्यासाठी पारोडी वस्तीवर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर दगडफेक केल्याची घटना आष्टी तालुक्यातील पारोडी येथे सकाळी घडली. जमावाने घेरून हल्ला केल्याने या हल्ल्यात दोन पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.

वस्तीवरील हल्लेखोरांनी पोलिसांवर नुसती दगडफेकच केली नाही तर लाठ्या काठ्याने मारहाण केली. या घटनेची माहिती संबंधीत पोलिसांनी आपल्या वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक यांच्यासह दंगल नियंत्रण पथक पाचारण करण्यात आले.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची धरपकड सुरू असून दुपारी 1 वाजेपर्यंत पाच हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

वस्तीवर सध्या तणावाचे वातावरण आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पोलिस कर्मचारी आज सकाळी पारोडी वस्तीवर गेले होते. वस्तीवर गेल्यानंतर दोन पोलिस कर्मचारी गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी गाडीतून खाली उतरले. तिघे जण पोलिस गाडीत थांबले.

आरोपींना आणण्यासाठी गेलेले पोलिस नाईक प्रल्हाद देवडे व कॉन्स्टेबल शिवदास केदार हे जसे जसे वस्तीजवळ गेले तसे वस्तीवरील उपस्थित जमावांनी त्यांना पाहताच त्यांच्या विरोधात दगडफेक करायला सुरूवात केली.

अचानक मोठ्या प्रमाणावर दगड येत असल्याचे पाहून पोलिसांनी बचावात्मक पवित्रा घेतला मात्र समोर जमाव मोठ्या प्रमाणावर होता.

तो जमाव काठ्या लाठ्या घेवून पोलिसांच्या दिशेने धावत आला. त्यांना लाठ्यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली.

 

तोपर्यंत जखमी अवस्थेत दोन पोलिसांना कुंटेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिकडे आष्टीचे पोलीस उपअधिक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित बेभरे यांनी दंगल नियंत्रण पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

राज्यात सर्वाधिक ऊस बीड मध्ये शिल्लक

वस्तीवर मोठ्या प्रमाणावर पोलिसंचा फौजफाटा पाहून वस्तीवरून काही जण फरार झाले. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याचे समजते. सध्या वस्तीवर तणावाचे वातावरण असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.