beed crime accused

ताज्या बातम्या

beed crime accused आरोपीने पळून जाण्यासाठी घडविला पोलीस व्हॅनचा अपघात

By admin

November 28, 2022

 

बीड

beed crime accused  बीडच्या मुळूकवाडी येथे जमिनीच्या तुकड्यासाठी चुलत्याच्या खून करणाऱ्या आरोपी रोहिदास निर्मळने, पंचासह घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी जात असतांना, पळून जाण्याचा प्रयत्न करत, पोलीस व्हॅनचा अपघात घडवलाय. ही धक्कादायक घटना बीडच्या मांजरसुंबा – पाटोदा महामार्गावरील जाधव वस्ती येथे घडली.

या घडवून आणलेल्या अपघातात, पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्यासह 4 पोलीस, 2 शासकीय पंच आणि आरोपी रोहिदास निर्मळ हा जखमी झाला आहे.

तर यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या सर्व जखमींवर बीड शहरातील लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गेल्या दोन दिवसांपूर्वी बीडच्या मुळुकवाडी गावात जमिनीच्या तुकड्याच्या वादातून, वयोवृद्ध चुलता चुलतीवर सख्या पुतण्याने कोयत्याने सपासप वार करून हल्ला चढवला होता.

यामध्ये 80 वर्षीय चुलत्याचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणातील आरोपी असणाऱ्या रोहिदास निर्मळ याला, घटनास्थळी पाहणी करत आणि यावेळी वापरण्यात आलेले हत्यार आणि कपड्याची जप्ती करण्यासाठी नेकनूर पोलीस घेऊन जात होते. यादरम्यान जाधववस्ती जवळ हा अपघात घडवून आणला.

दरम्यान आरोपीला घटनास्थळी घेऊन जात असताना, आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याने अपघात घडून आणला. यामध्ये आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर पंच आणि आरोपी देखील जखमी झाला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.