ताज्या बातम्या

beed congress news बीडमधून काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ

By admin

February 06, 2023

 

बीडमधून काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ

बीड । प्रतिनिधी

beed congress news काँग्रेस पक्ष हा एक विचार आहे, काँग्रेस न संपणारा पक्ष आहे, भले-भले संपले पण काँग्रेस संपली नाही, असे सांगत भाजपाकडून जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करून समाजात द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे. येत्या काळात जनता आता काँग्रेसच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बदल दिसून आला आहे. काँग्रेसने विकासाचं राजकारण केलं असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे. ते बीड शहरातील बालेपीर भागात ‘हात से हात जोडो’ अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. आज शहरातील बालेपीरमध्ये ‘हात से हात जोडो’ अभियानचा शुभारंभ देशमुख यांच्या हस्ते झाला. या वेळी ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाला गणेश बजगुडे, परवेज कुरेशी, नारायण होके, मालोजी गलांडे, दत्ताभाऊ गलांडे, अशोक देशमुख, जाधव सर, बहादूरभाई, आफरोज तांबोळी सय्यद फरहान, शेख मोहसीन, कदर बाबा, हनुमान घोडके, अमजद कुरेशी, कर्मा चाऊस यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होते. पुढे बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की, सध्याचं भाजपाचं सरकार भांडवलधार्जीने आहे. गांधींचे विचार रुजवणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांचं सरकार आणण्यासाठी राहुल गांधी यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. नुकतेच विधान परिषदेच्या निवडणुकीत महाआघाडीच्या बाजुने जनतेने कौल दिला आहे. येत्या काळात देशातील जनता नक्कीच राहुल गांधी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील, असं सांगत काँग्रेस हा एक विचार आहे, आजपर्यंत काँग्रेसने जेही केलं आहे ते जनतेचं हित डोळ्यांसमोर ठेवून काम केलं आहे. भले भले संपले पण काँग्रेस पक्ष संपला नाही, भाजपाकडून जातीपातीचं राजकारण करून समाज विभागण्याचं काम केलं जाऊ लागलं. येत्या कार्यकाळात काँग्रेसच देशाचं नेतृत्व करील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.