beed Collector's order to remove maratha arakshan village ban board

ताज्या बातम्या

गावबंदीचे बोर्ड हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By admin

April 04, 2024

 

Beed,

beed Collector’s order to remove maratha arakshan village ban board न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही गावाला गावबंदी करता येणार नाही तसे कुठलेही बोर्ड लावता येणार नाही तसे बोर्ड असल्यास ते काढून घ्यावे, आणि न्यायालयाची अवहेलना केली असल्यास कायदेशीर कारवाई करावी असेही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्देशित केले.

मतदान यंत्रांचे प्रथमस्तरीय संगणीकृत सरमिसळ 10 एप्रिलला होणार 

एखाद्या घटनेची संभाव्य माहिती मिळत असल्यास ती होण्यापूर्वीच योग्य ती कारवाई पोलिसांकडून करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांच्याकडून करण्यात आली.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या  पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून   चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 39 बीड मतदार संघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात कुणाकडे अनाधिकृत शस्त्र असल्यास ते जमा करण्याचे सक्त आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

        जिल्हा नियोजन सभागृहात आज सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 ची कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बोलत होत्या.  यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी,  पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर जिल्हाअधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी,  अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, सर्व जिल्ह्याचे सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या लोकसभा जिल्हा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

       बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अनाधिकृत शस्त्र मोठ्या प्रमाणात आहेत. अनधिकृत शस्त्र  जमा न करणाऱ्यांवर   पोलिसांनी   कायदेशीर कारवाई करावी.

अनाधिकृत शस्त्र जमाबाबतची आढावा बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.

         यावेळी जिल्हा निर्णय निवडणूक अधिकारी यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवरचा नाकेबंदीचा पॉईंट दुसऱ्या जिल्ह्याच्या सीमेलगत असावा असे सुचविले.  यामुळे दोन्ही जिल्ह्यातून अवैध होणारी वाहतूक अथवा अन्य कायदा सुव्यवस्था बिघडणाऱ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. जर दोन जिल्ह्यातील अंतर अधिक असेल अशावेळी अधिकचा बंदोबस्त लावण्यात यावा असे यावेळी निर्देशित केले.

        जिल्ह्यात 14 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली असून या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसांना मूलभूत सुविधा प्रदान कराव्यात अशा सूचना यावेळी जिल्हा दंडाधिकारी यांनी केल्या.

                न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही गावाला गावबंदी करता येणार नाही तसे कुठलेही बोर्ड लावता येणार नाही तसे बोर्ड असल्यास ते काढून घ्यावे, आणि न्यायालयाची अवहेलना केली असल्यास कायदेशीर कारवाई करावी असेही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्देशित केले.

एखाद्या घटनेची संभाव्य माहिती मिळत असल्यास ती होण्यापूर्वीच योग्य ती कारवाई पोलिसांकडून करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांच्याकडून करण्यात आली.

          जे पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत त्यांच्यासाठी पोस्टल मतदानाचा उपयोग करन्यात आलेला आहे. यासाठी सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुविधा केंद्र तयार करून पोस्टल मतदानासाठी ग्राह्य असलेल्या मतदारांचे मतदान करून घ्यावे, अशा सूचना यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यावेळी केल्या.