ताज्या बातम्या

जिल्ह्यात पुन्हा बालविवाह रोखला

By admin

July 03, 2023

बीड

Beed child marriage जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे.दररोज वेगवेगळ्या ठिकाणी बालवविवाह होत असल्याच्या घटना घडत आहेत.यावर जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. आज बीड तालुक्यातील चराटा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलीस आणि चाइल्डलाईन च्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.

यासंदर्भात यामुलीच्या वडिलांनी आणि भावाने पोलीस आणि चाइल्डलाईन कडेे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज दुपारी अल्पवयीन मुलीचा विवाह दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाशी होत असल्याचे पोलिस आणि चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांना आढळून आले.त्यांनी हा विवाह रोखला असून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.अशी माहिती चाईल्ड लाईनचे तत्वशील कांबळे यांनी दिली.हे लग्न मुलीची आई लावून देत होती.

बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या child marriages in beed  बालविवाहांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सातत्यानेसातत्याने जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहेयासाठी प्रशासन आणि समाज या दोन्ही एकत्र येऊन पालकांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.