बीड
beed bumper rainfall today बीड जिल्ह्यात अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस काही भागात झाला आहे. पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले ओढे वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. तर शेतामध्ये देखील पाणी साचले आहे. बीड जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने पेरण्या लवकर होतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धोंडराई उमापूर ,चकलंबाबीड तालुक्यातील चौसाळा पाटोदा तालुक्यातील दासखेड थेरला या मंडळात मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली.धोंड्राई मंडळामध्ये 79.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.जिल्ह्यातील बीड तालुक्यामध्ये 24.3 मिलिमीटर परळी तालुक्यामध्ये 36.4 मिलिमीटर आणि गेवराई तालुक्यामध्ये 32.8mm इतक्या पावसाची नोंद झाली आहे.माजलगाव 8.9 mm, अंबाजोगाई 3.8 mm,केज 15.6 mm, परळी 5.5 mm, धारूर 8.4 mm, वडवणी 9.5 आणि शिरूर 20.5 इतका पाऊस पहिल्याच दिवशी पडला आहे.