avinash sable wins gold medal in asian games

क्रीडा

अखेर सुवर्ण पदकाला गवसणी घातलीच …

By admin

October 01, 2023

बीडच्या अविनाश साबळेने पटकावले स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक

एशियन गेम्स मध्ये बीडच्या अविनाश साबळेने 3000 मीटर ट्रिपल चेस मध्ये सुवर्णपदक पटकावले.

avinash sable wins gold medal in asian games चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा स्टार अ‍ॅथलीट अविनाश साबळे याने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. त्याने स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. अविनाश साबळे हा मुळचा बीडचा रहिवाशी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे आजचे १ ऑक्टोबर चे दुसरे सुवर्णपदक आहे. या यशाबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी साबळे यांचे अभिनंदन केले. तसेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. बीड अविनाश साबळे च्या या यशाचे जल्लोषात स्वागत केले. जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी अविनाशच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

avinash sable wins gold medal in asian games

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील avinash sable record in steeplechase बीडच्या सुपुत्रानं सुवर्णमय कामगिरी केली आहे. अविनाश साबळे यांनं आशियाई स्पर्धेत इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे. अविनाश साबळेच्या या यशानं भारताला आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरता आलं आहे.

अविनाश साबळे यानं काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. यावेळी आशियाई स्पर्धेत तो सुवर्णपदक मिळवेल अशी आशा सर्व भारतीयांना होती. चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

गेल्या महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश हा ७ व्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळं त्या कामगिरीवर अविनाश साबळे देखील स्वत: खुश नव्हता. मात्र, अविनाश साबळे यानं आशियाई क्रीडा स्पर्धेत नव्या उमेदीन सहभाग घेतला आणि आज सुवर्णपदाकवर नाव कोरलं आहे.

अविनाश साबळे यानं आजच्या स्पर्धेपूर्वी यंदाच्या हगांमातील हांगझोऊ येथील आशिायाई क्रीडा स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असल्याचं म्हटलं होतं. मी राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यासाठी धावत नसून हांगझोऊ मधील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा मानस असल्याचं तो म्हणाला होता. मी आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी धावणार आहे. यासाठी प्रशिक्षण घेतलं असून चांगली कामगिरी करुन सुवर्णपदकावर नाव करोणार असं तो म्हणाला होता.

अखेर avinash sable अविनाश साबळेनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यां ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. याशिवाय तो ५ हजार मीटर क्रीडा प्रकारात देखील प्रयत्न करणार आहे.

३००० मीटर स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा विश्वास अविनाश साबळे यानं स्पर्धेपूर्वी व्यक्त केला होता. तो त्यानं सत्यात उतरवला आहे.