आव्हाणे

ताज्या बातम्या

आव्हाणे येथील साई गणेश किराणा दुकान जळीत प्रकरणातील दोन आरोपी अटकेत — स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By admin

November 01, 2025

अहिल्यानगर, दि. 1 नोव्हेंबर 2025: शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथील साई गणेश किराणा दुकान जाळण्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेत दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

घटनेचा तपशील

दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे सुमारे 1.49 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी आव्हाणे (ता. शेवगाव) येथील साई गणेश किराणा दुकान पेटवून दिले. त्यांनी बॉटलमधील पेट्रोल/डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थ दुकानाच्या शटरवर ओतून आग लावली, ज्यामुळे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले.

या घटनेबाबत राहुल सिताराम कोळगे (वय 33, रा. वाघोली रोड, आव्हाणे बु.) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून गु.र.नं. 907/2025, भा.न.सं. 2023 चे कलम 326(छ) व 385 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेची वेगवान कारवाई

शेवगाव पोलीस ठाण्याचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. हरीष भोये व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. पथकात पोलीस अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रिचर्ड गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे, जालिंदर माने, किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, सोनल भागवत, चालक चंद्रकांत कुसळकर तसेच शेवगाव पोलीस ठाण्याचे पोउपनि. रामहरी खेडकर, पोलीस अंमलदार नकुल फलके व दादासाहेब खेडकर यांचा समावेश होता.

आरोपींचा शोध आणि अटक

गुप्त माहितीच्या आधारे पथकाने 30 ऑक्टोबर 2025 रोजी तपोवन रोड (अहिल्यानगर) परिसरात सापळा रचला. त्या ठिकाणी संशयित दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे —

  1. निलेश शिवाजी नेहुल (वय 26, रा. आव्हाणे ., ता. शेवगाव)
  2. बवाज उर्फ गौरव सॅमसन उजागरे (वय 24, रा. बुरुडगाव, ता. अहिल्यानगर)अशी सांगितली.

दोघांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी आणखी एका साथीदाराचा — अभिषेक बाळसाहेब साळवे (रा. झोपडपट्टी, बुरुडगाव) — सहभाग असल्याचे सांगितले. तिसरा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पुढील तपास सुरू

अटक केलेले दोन्ही आरोपी शेवगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.