ताज्या बातम्या

Aurangabad crime औरंगाबादच्या जैन मंदिरातील मूर्ती चोरांना मध्य प्रदेशातून अटक  अवघ्या ३६ तासात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना यश 

By admin

December 26, 2022

 

Aurangabad crime औरंगाबादच्या जैन मंदिरातील मूर्ती चोरांना मध्य प्रदेशातून अटक  अवघ्या ३६ तासात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना यश

औरंगाबाद

Aurangabad crime जैन धर्मियांचे तीर्थस्थळ कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्तीची अज्ञात चोरट्यांनी अदलाबदल केल्याचा धक्कादायक प्रकार मूर्तीचा रंग उडत गेल्यानंतर शनिवारी उघडकीस आला.

औरंगाबाद पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया यांनी दोन पथकांची नेमणूक करत तपासाच्या दृष्टीने इतर राज्यात रवाना करण्यात आले होते.

भगवान पार्श्वनाथांची १ कोटी ५ लाखांची सोन्याची मूर्ती चोरी करणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. आरोपींनी चातुर्मास दरम्यान तीन महिने मंदिरात वास्तव्य केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

अर्पित नरेंद्र जैन ( ३२, शिवपुरी, मध्यप्रदेश) आणि अनिल विश्वकर्मा (२७ , शहागड, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून मूर्तीच्या तुकड्यातून बनवलेले सुवर्ण नाणे, रोख रक्कम असा ९५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.