ताज्या बातम्या

या खेळाडूला आर्मी देणार 40 लाख रोख पारितोषिक

By admin

October 18, 2023

 

न्यू दिल्ली ,

Athletics indian army चीन मध्ये हांगझोऊ, इथे नुकत्याच झालेल्या एकोणिसाव्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये सशस्त्र दलातील पदक जिंकलेल्या खेळाडूंनां संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रोख पारितोषिके जाहीर केले आहे.

Athletics india,पदक जिंकलेल्या खेळाडू आणि सहभागी झालेल्या खेळाडूंना आणि सहायक कर्मचाऱ्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 17 ऑक्टोबर 2023 रोजी सन्मानित केले. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांनी एकूण 76 खेळाडू आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि स्पर्धेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

यामध्ये बीड जिल्ह्यातील स्टिपलचेस खेळाडू avinash sable beed अविनाश साबळे पालखी समावेश होता.त्याने दोन पदके जिंकली. एक सुवर्ण आणि मत रौप्य पदकाचा समावेश आहे.

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची यादी

देशाला गौरव प्राप्त करून देणाऱ्या आणि Athletics in india,आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा  16 वैयक्तिक पदके (03 सुवर्ण, 06 रौप्य आणि 07 कांस्य) आणि आठ सांघिक पदके (02 सुवर्ण, 03 रौप्य आणि 03 कांस्य) पटकावून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांना राजनाथ सिंह  यांनी संरक्षण मंत्रालयाच्या वतीने रोख पारितोषिके जाहीर केली.

सुवर्णपदक विजेत्यांना 25 लाख रुपये; रौप्यपदक विजेत्यांना 15 लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. 23 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर 2023 या कालावधीत झालेल्या या खेळांमध्ये तीन क्रीडापटूंसह 88 सैनिकांच्या तुकडीने, 18 क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतला.

आपली सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मात्र पदक न मिळवू शकलेल्या खेळाडूंसह सर्व खेळाडूंच्या प्रयत्नांचे संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केले.

Athletics of Indian Army, खेळाडूंची ही कामगिरी आणि पदकांमुळे देशातील भावी पिढीला खेळांमध्ये पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळेल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नेहमीच  वेगवेगळ्या खेळांमध्ये पदक जिंकणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांचे संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केले.