राजकारण

आष्टी पाटोद्यामध्ये परिवर्तनाचा नवा युवा चेहरा डॉ. महेश थोरवे

By admin

August 02, 2024

विधानसभेसाठी डॉ. थोरवे यांच्या नावाच्या चर्चेने राजकीय क्षेत्रात बदलाची चाहूल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाकडे उमेदवारीची मागणी

कडा,

Ashti vidhansabha election राज्य विधानसभेची घोषणेची वाट पाहत असताना बरेच नवे चेहरे रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. प्रत्येक मतदार संघांमध्ये कृतिशील नवे चेहरे या निवडणुकीचे वेगळेपण राहू शकते. तसेच सर्व राजकीय पक्ष उमेदीच्या नवीन नेतृत्वाचा शोध घेत आहेत. त्यातच बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघातून उच्च शिक्षित, समाजाची जाण असलेले आणि राजकारणाची समीकरणे बदलण्याची धमक असणारे डॉ. महेश थोरवे यांच्या नावाची सर्वच स्तरातून चर्चा होऊ लागली आहे. यांच्या नावामुळे या मतदार क्षेत्रात राजकीय समीकरणे बदलून प्रस्थापितांना पूरक पर्याय मिळण्याची दाट शक्यता आहे.

प्रश्न तो एवढाच उरला आहे की आता कोणत्या पक्षातून ते आपली उमेदवारी घोषित करतील. राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे बीड जिल्ह्यामध्ये वर्चस्व निर्माण झाले आहे. बजरंग सोनवणे यांचा लोकसभा बीड मतदार संघात झालेला विजय व वाढलेले महत्त्व तसेच जातीय ध्रुवीकरण यामुळे या उमेदवारीला महत्व प्राप्त झाले आहे, त्यातच सूत्रांनुसार, डॉ. महेश थोरवे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाकडून नवा चेहरा म्हणून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

डॉ. थोरवे यांचे शरद पवार साहेबांशी असलेले प्रत्यक्ष संबंध तसेच पूर्ण पवार कुटुंबाशी असणारा त्यांचा अनुबंध, मतदार संघासह संपूर्ण महाराष्ट्रभर असणारा त्यांचा दांडगा जनसंपर्क, कार्यकुशलता, युवकांमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता, मतदार संघातील राजकीय कार्यकर्त्यांमधून त्यांना मिळणारा दुजोरा, मतदार संघातील काही बड्या नेत्यांचा पाठिंबा, जनमत आणि जनमताद्वारे उमेदवार बदलांचे संकेत या सर्व बाबी यांच्या उमेदवारीला पुष्टी देणाऱ्या आहेत.

जातीय समीकरणातून चर्चिल्या गेलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत अटीतटीचा सामना झालेल्या बीड जिल्ह्याकडे आता सर्वच पक्षांचे लक्ष वेधले. तोंडावर आलेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीत आता बीड जिल्ह्यात काय चित्र असेल यावर अवधा महाराष्ट्र डोळे लावून पाहत आहे. जातीय समीकरणे आणि मतांचे ध्रुवीकरण करू शकणाऱ्या उमेदवाराला संधी मिळू शकते. असे असताना प्राथमिक स्तरावर इच्छुक उमेदवारांची बरीच नावे बीड जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदार संघातून पुढे येऊ लागली आहेत. त्यापैकी आष्टी-पाटोदा-शिरुर मतदार संघातून डॉ. महेश थोरवे यांच्या नावाची सर्वच स्तरातून चर्चा सुरू झाली आहे. जनतेच्या अपेक्षा नुसार या मतदारसंघात उच्चशिक्षित आणि समाज परिवर्तनाची दिशा असणाऱ्या व्यक्तीकडे अधिक कौल असेल.

शैक्षणिक प्रशासक, नियोजन आणि निष्पादन तज्ञ, सामाजिक कृतीवादी कार्यकर्ता, लेखक, कवी, कलाकार व कुशल वक्तृत्व

असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या डॉ. महेश थोरवे यांनी यापूर्वी विविध शासकीय-निमशासकीय जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. साहित्य, समाजकारण, उद्योजकता व प्रशासन व्यवस्था अशा सर्वच स्तरावर असणारा त्यांचा सहज वावर त्यांची बाजू भक्कम करतो. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळावी अशी मागणी मतदारांकडून होत आहे. सर्व सामन्यांमध्ये मिसळणारे आणि सर्वांच्या मदतीसाठी रचनात्मक पातळीवर कार्यकुशल असणारे व्यक्तिमत्त्व ही त्यांची आजवर राहिलेली ओळख आहे.

शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी असणारे हे व्यक्तिमत्त्व आता लोक प्रतिनिधी म्हणून आष्टी-पाटोदा-शिरूर मध्ये परिवर्तनाचा नवा चेहरा राहील यावर मतदार संघात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच डॉ. महेश थोरवे हे मतदार संघासाठी नवा उमदा चेहरा असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांना दखल घ्यायला भाग पाडेल असा हा चेहरा किती आश्वासक राहू शकतो? लोकांची पसंती किती विश्वासाने पूर्ण होईल आणि थोरवे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

“ जनतेला नवीन चेहरा हवा आहे. त्यातच मला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता व जनसामान्य लोकांकडून होणारा आग्रह म्हणून मी स्वतः आष्टी-पाटोदा-शिरुर मतदार संघातून येणारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून मा. पवार साहेबांनी संधी आणि आशीर्वाद दिले तर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहे.