ashti award news

ताज्या बातम्या

आदर्श पत्रकार म्हणून रघुनाथ कर्डिले सह सात जणांना राज्यस्तरीय पुरस्काराने केले सन्मानित

By admin

February 17, 2023

द्वारका प्रतिष्ठानने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन तरुणांचा नावलौकिक वाढविला : राऊत दादा महाराज

ashti award news आदर्श पत्रकार म्हणून रघुनाथ कर्डिले सह सात जणांना राज्यस्तरीय पुरस्काराने केले सन्मानित

आष्टी : प्रतिनिधी

ashti award news आष्टी तालुक्यामध्ये द्वारका प्रतिष्ठान ही एक सामाजिक काम करणारी गुरुकुल शिक्षण पद्धत असणारी शाळा आहे. या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत असून आपल्या संस्कृतीची जपवणूक करण्याचे महान कार्य होत आहे. त्याचबरोबर यावर्षी द्वारका प्रतिष्ठानने समाजातील तरुणांना राज्यस्तरीय पुरस्कार दिल्याने या तरुणांचा नावलौकिक वाढविला असल्याचे प्रतिपादन धर्मभूषण राऊत दादा महाराज यांनी केले.

ते कडा येथील प्रा. अविनाश भवर यांच्या द्वारका प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळ्यामध्ये अध्यक्ष पदावरन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बबनराव औटे, नगरसेवक राजेंद्र पवार,प्राचार्य सानप, शाम भोजने,नवनाथ औदकर,शिरीषभाऊ थोरवे,रामचंद्र निंभोरे,राउतात्या भस्मे,आसाराम भवर,विठ्ठल पडोळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद ढोबळे,अतुल जवणे,प्रा.शाम सांगळे,शिवलाल थोरवे,संतोष पडोळे,अजिनाथ पडोळे,प्राचार्य शीला भवर,प्राचार्य सोपान निंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते अमित आणि सुमित बाळासाहेब ढोबळे-राज्यस्तरीय आदर्श व्यावसायिक प्रोत्साहन पुरस्कार,भुकन रामेश्वर श्रीधर,टाकळीअमिया तालुका आष्टी-राज्यस्तरीय आदर्श संस्कृती रक्षक पुरस्कार,सौ. शिल्पा संजय देवडे,जनसंपर्क अधिकारी आरंभ पोलिटिव्ह कॅन्सर केअर सेंटर,अहमदनगर-राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार,रघुनाथ तुकाराम कर्डिले,पत्रकार पुण्यनगरी-राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार,महेश कल्याण सांगळे,संचालक महेश उद्योग समूह कडा राज्यस्तरीय आदर्श उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुढे बोलताना राऊत दादा महाराज म्हणाले की, द्वारका प्रतिष्ठानने योग्य व्यक्तींना पुरस्कार दिले असून यापुढेही गुणवंत व संस्कारक्षम व्यक्तींना पुरस्कार देण्याचे काम सुरू ठेवावे. त्याचबरोबर आजच्या महिलांनी व पुरुषांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सध्या धावपळीचे युग सुरू असून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका याचे परिणाम दूरगामी होत असल्याने आरोग्याचे भान ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रस्ताविक पर भाषणात द्वारका प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा,. अविनाश भवर म्हणाले की भारतामध्ये इंग्रजांनी गुरुकुल शिक्षण पद्धती मोडीत काढली त्यानंतर आता गुरुकुल शिक्षण पद्धती काळाची गरज बनली आहे.

पालकांनी विद्यार्थ्याकडे परीक्षा व स्पर्धा करिता मुलं घडविण्याचे ध्येय मनाशी धरू नये आपला पाल्य एक माणूस म्हणून, देशभक्त म्हणून कसा घडेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी स्पर्धा परीक्षा बरोबरच संस्कारावर पालकांनी लक्ष देण्याचे आवाहन प्रा. भवर यांनी केले.

यावेळी द्वारका प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी कलाविष्कार हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी देशभक्तीपर व मराठमोळ्या गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक नेते सिद्धेश्वर शेंडगे यांनी केले तर आभार अजिनाथ पडोळे यांनी मानले.