भारतीय लष्कराकडून सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने शहरात तीन दिवसीय सायकल पोलो स्पर्धेचे आयोजन अहमदनगर,
armed forces cycle polo tournament in ahmednagar भारतीय लष्कराने सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अहमदगर शहरामध्ये आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक 2023 आयोजित करण्याची घोषणा केली. या स्पर्धेमध्ये देशातील सर्वोत्तम सायकल पोलो खेळणारे संघ ह्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सीपीआयएफच्या आगामी सायकल पोलो विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय वायुसेनेचे सायकल पोलो संघ,(indan air force ) भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स ( indian army )आणि प्रादेशिक सेना (indian territorial army ) एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.
या स्पर्धांचे आयोजन एसीसीअँडएस (ACC&S) मधील पोलो ताल मैदानावर करण्यात आले आहे. येथील एसीसीअँडएस (ACC&S) मधील आर्मी स्पोर्ट्स नोड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे व्यवस्थापक (इव्हेंट मॅनेजर), सीपीआयएफचे अधिकारी आणि तीनही संघांचे कर्णधार उपस्थित होते.
१९ मार्च ते २१ मार्च दरम्यान नियोजित तीन संघांमधील सात सामने खेळले जाणार आहेत. विजेते १.५ लाखांच्या बक्षिसाच्या रकमेसह उडचलो आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक (udChalo udChalo Armed Forces Cycle Polo Trophy) ( armed forces cycle polo cup )प्रदान करण्यात येईल.
देशात सायकल पोलो हा खेळ अनेक वर्षापासून खेळला जातो. मात्र या खेळासाठी जागा मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. मात्र ग्रामीण भागात ही जाग उपलब्ध असते त्यासाठी आता हा खेळ ग्रामीण भागात पण नेण्याचा प्रयत्न या माध्यामतून होत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून indian army ची टीम आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम विजेती टीम ठरली आहे. संरक्षण दलाच्या तीन विभागाच्या टीम यामध्ये सहभागी होत असल्याने यातून आंतरराष्ट्रीय संघ पुढे येणार आहे . यासाठी ahmednagar army sport node ने पुढाकार घेऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी सर्व टीमशी संपर्क साधून ही पहिलीच first combined armed forces cycle polo tournament in ahmednagar स्पर्धा आयोजित करण्यात आली.
उडचलो (udChalo) हे एक अग्रगण्य ग्राहक टेक स्टार्ट अप आहे जे केवळ सशस्त्र दलांना सेवा देते आणि भारताच्या संरक्षण दलासाठी एक सुपर अॅप म्हणून ते तयार केले आहे आणि ते आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक २०२३ अधिकृत प्रायोजक आहेत.
आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषक २०२३ चे कार्यक्रम व्यवस्थापक लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू यांनी सांगितले कि, “आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याच्या बाबतीत भारतीय सशस्त्र दल नेहमीच आघाडीवर असते. आपल्या देशाच्या सायकल पोलो संघाने सायकल पोलो विश्व चषक स्पर्धेत ६ वेळा सुवर्णपदक मिळवून आपला अभिमान वाढवला आहे. या खेळाला योग्य मान्यता मिळण्याची हीच वेळ आहे आणि एक राष्ट्र म्हणून आम्ही आमच्या सशस्त्र दलांमध्ये हे जे खेळाडू घडवतो त्या अप्रतिम खेळाडूंच्या कौतुकासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येऊ.”
सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी के. के. सोनी म्हणाले, “सायकल पोलो हा एक अत्यंत गतिशील व प्रचंड उर्जेने भरलेला असा खेळ आहे ज्यामध्ये हॉर्स पोलोची चपळता आणि सायकलिंगचा वेग व तीव्रता यांचा मेळ आहे. हा एक रोमांचक खेळ असून शारीरिक दृष्ट्याो ताकद व ऊर्जेची गरज असलेला खेळ आहे. ज्यासाठी कौशल्य, अचूकता आणि टीमवर्क आवश्यक आहे. अहमदनगरला पहिल्यांदाच हा अनोखा खेळ अनुभवायला मिळणार आहे.
आम्ही आमच्या देशात खेळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पाठिंबा देण्याचा विचार करत आहोत आणि पुढच्या यशस्वी हंगामाची वाट पाहत आहोत. संघांच्या कर्णधारांना माझ्या शुभेच्छा.”
या स्पर्धेच्या माध्यमातून सशस्त्र दल सायकल पोलो या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंची जोपासना वाढवण्यासाठी समर्पित आहे.
भारतीय वायुसेनेच्या संघाचे नेतृत्व जेडब्ल्यूओ (JWO) विष्णू एस करतील आणि जेडब्ल्यूओ (JWO) असरुद्दीन शा हे संघाचे प्रशिक्षक असतील. भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स संघाचे नेतृत्व लेफ्ट्नंट पीयूष कुमार सिन्हा करतील तर लेफ्ट्नंट विनोद कुमार हे संघाचे प्रशिक्षक असतील. प्रादेशिक लष्कराच्या संघाचे नेतृत्व सिपाही सनोफर करतील तर या संघाचे प्रशिक्षक हविलदार अंशद ए असतील.