ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकेडून लाच घेताना पर्यवेक्षिका पकडली

By admin

August 02, 2024

आष्टी,

मिनी अंगणवाडी चे  मोठ्या अंगणवाडीत रुपांतर झाल्यानतर या मिनी अंगणवाडीच्या सेविकेकडून बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांची लाच घेताना आष्टी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयातील पर्यवेक्षिका सह कनिष्ठ सहाय्यक या दोघींना लाच घेताना बीड च्या लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

आष्टी तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अधीन असेलल्या पाटसरा येथील anganwadi news ashti अंगणवाडीचे उच्चीकरण झाल्याने या मिनी अंगणवाडीचे मोठ्या अंगणवाडीत रुपांतर करण्यात आले. त्यामुळे या अंगणवाडी सेविकेचा पगार वाढला. या बदल्यात बक्षीस म्हणून पाच हजार रुपये देण्याची मागणी पर्यवेक्षिका अमृता श्रीकांत हाट्टे आणि कनिष्ठ सहाय्यक नीता रामदास मलदोडे यांनी केली होती. यासंदर्भात या अंगणवाडी सेविकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर त्यांना पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले.

 आरोपी क्रमांक एक अमृता हाट्टे व दोन  नीता मलदोडे यांनी केली  व आरोपी क्रमांक दोन हिने पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असून दोन्ही लोकसेवक यांना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड यांच्यासह श्रीराम गिराम, संतोष राठोड , सुदर्शन निकाळजे,  अमोल खरसाडे,  अंबादास पुरी, ला. प्र. वि.बीड यांनी कारवाई केली.