प्रादेशिक वृत्त

नितीन चव्हाण, दिनकर शिंदे, संतोष स्वामी पुरस्काराने सन्मानित

By admin

February 05, 2024

 

Ambajogai news patrakarita purskar,Ambajogai news,दर्पण व मूक नायक,अंबाजोगाई,मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई

 

अंबाजोगाई  (प्रतिनिधी)

Ambajogai news patrakarita purskar महाराष्ट्र शासनाने भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार देऊन राज्यातील पत्रकारांचा गौरव करावा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार तथा दुरदर्शन चे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी केले.

मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने दर्पण व मूक नायक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्या निमित्य अरुण समुद्रे हे बोलत होते.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष एस बी सय्यद, म प परिषद डिजिटल मीडिया प्रमुख अनिल वाघमारे, हल्ला विरोधी कृती समितीचे बीड जिल्हा निमंत्रक दत्तात्रय अंबेकर, राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे, विभागीय संघटक सुभाष चौरे, जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे, डिजिटल मीडिया जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सिरसाट, बीड येथील वृत्तपत्र विक्रेते चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके हे होते.

या वेळी सन 2024 चा स्व. मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार नितीन पापालाल चव्हाण- दै लोकाशा उपसंपादक बीड यांना, स्व. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार दिनकर तुळशीराम शिंदे- दै. पार्श्वभूमी व डी एस न्यूज गेवराई यांना तर सहकार महर्षी स्व दत्तात्रय शिंदे स्मृती पत्रकारिता पुरस्कार संतोष बाबुराव स्वामी- दै लोकमत प्रतिनिधी दिंद्रुड यांना दूरदर्शन प्रतिनिधी अरुण समुद्रे यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना अरुण समुद्रे म्हणाले की आजच्या पत्रकारांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता केवळ दलित पत्रकारिता नव्हती तर चळवळीची होती.

राज्यात अकोला व अंबाजोगाई ही दोनच गाावे अशी आहेत जिथे दर्पण व मूकनायक दिन संयुक्त रित्या होत असतो.

आजच्या पत्रकारिते बद्दल बोलतांना ते म्हणाले की पत्रकारांच वाचन संपुष्टात आलेले आहे, बातमी कडे पाहण्याचा दृष्टीकोन काय यावर पत्रकारांची पत्रकारिता अवलंबून आसते. किती पत्रकारांची वाचनालयात खाती आहेत, किती पत्रकार आपल्या वर्तमान पत्राचा अग्रलेख वाचतात. आपलं वर्तमान पत्र आपण वाचायला शिकल पाहिजे. ग्रामीण पत्रकारिते मधून आपली बोली भाषा बदलत चालली आहे, डिजिटल मीडियात बोली भाषा समजून घेतली पाहिजे. डिजिटल मीडियात खोट बोलता येत नाही, प्रमाणीक पणाच्या रस्त्यावर कमी गर्दी असते तसं डिजिटल मीडियाचे झाले आहे. अंबाजोगाईच्या पत्रकारांनी डिजिटल मीडियासाठी आवाज व कॉपी राईट ची शाळा घ्यायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली. आजच्या धावपळीच्या जीवनात पत्रकारा समोर कुठला दिवस कसा येईल याची शास्वती नसते त्यासाठी पत्रकारांना घरी पत्नी असली तरी बाहेर सांभाळणारा जिवलग मित्र असायला हवा असं मत व्यक्त करतेवेळी पत्रकारांच्या आरोग्याची काळजी कोण घेत नसतो त्या साठी पत्रकारांचा ग्रुप इन्शुरन्स करायला हवा असं मत ही त्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. या वेळी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करायला हवी, पत्रकार समाजाचा आरसा असून पत्रकारा कडुन समाजातील शोषितांना न्याय देण्याचा प्रयत्न व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या यशात पत्रकारांचा सिहाचा वाटा असल्याचे त्यांनी मान्य केले. या वेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार नितीन चव्हाण, दिनकर शिंदे, संतोष स्वामी यांनी सत्काराला उत्तर देते वेळी मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई शाखेच्या अभिनव उपक्रमा बद्दल संयोजकांना धन्यवाद दिले. तर अध्यक्षीय समारोपात विशाल साळुंके यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यभरात होणाऱ्या कार्यक्रमात अंबाजोगाई शाखा हिरीरीने सहभाग नोंदवत असल्याचे विषद करून सर्वांना धन्यवाद दिले. या प्रसंगी मा. श्री. राजेश जी इंगोले इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य सचिव पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल, मा. श्री. महेष अकोलकर यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझरस चा प्रगतशील शेतकरी पुरस्कार मिळाल्या बद्दल, मा. श्री. अभिनव अरुण पत्की यांनी UPSC मध्ये IES इंदियण इंजिनिरिग परीक्षेत देशात १४ वा क्रमाकाने यश संपादन केल्या बद्दल, मा. श्री. आर्यन संजय वाकडे रणजी संघात निवड झाल्या बद्दल, मा. श्री. प्रा.डॉ. सुवर्णा अंकुशराव वाघोळे यांनी उच्च्यशिक्षण प्राप्त केले २०१७ साली गृहविज्ञान परीक्षेत, SET परीक्षा २०२१ मध्ये गृहविज्ञान विषयात पी एच डी. व २०२३ ला शिक्षण शास्त्र विषयात सेट परीक्षा पास झाल्या बद्दल, मा. श्री. श्रीकांत देशपांडे राज्य मराठी पाठपुस्तक मंडळवर निवड झाल्या बद्दल, मा. श्री. रमेश पोतंगले एम पी एस सी परीक्षेत यशस्वी झाल्या बद्दल आणि मिलीय्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभिरूप संसद याचा नाटय प्रयोग सादर केल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे हल्ला विरोधी कृती समितीचे बीड जिल्हा निमंत्रक दत्तात्रय अंबेकर यांनी प्रास्ताविक, तालुका अध्यक्ष प्रशांत लाटकर यांनी कार्य अहवाल यांनी पाहुण्यांचा परिचय सचिव ज्ञानेश मातेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष पुनमचंद परदेशी यांनी तर सुत्रसंचलन विरेंद्र गुप्ता यांनी केले.

अंबाजोगाई येथील गुनीजान संगीत समारोहाचे उद्घाटन

कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी गजानन मुडेगावकर, अशोक दळवे, व्यंकटेश जोशी, गोविंद खरटमोल, वसुदेव शिंदे, राहुल देशपांडे, बालाजी खैरमोडे, शेख मुशीर बाबा, सय्यद नईम, आरेफ सिद्धीकी, अभिजित लोमटे, जोगोजी साबणे, विष्णु कांबळे, संजय जोगदंड, सतीश मोरे, सालम पठाण, संजय राणभरे, ताहेर पटेल, बालासाहेब ढगे, परमेश्वर वैद्य, गोविंद सूर्यवंशी, अनिरुद्ध पांचाळ कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रयत्न केले.