अकोले,
Akole news Water from Pimpalgaon Khand through the mediation of Pichad हाता तोंडाशी आलेले भाजीपाल्याचे पीक हातातून निसटून चालले आहे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे, भाऊ काही करा पिंपळगाव खांड मधून पाणी सोडा अकोले तालुक्यातील मुळा विभागातील शेतकरी वर्गाचे पाण्या वाचून मोठे हाल होत असल्याने आज लहित व परिसरातील अनेक शेतकरी मंडळींनी माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांची भेट घेऊन पाण्याची समस्या कानावर घालताच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही वेळेतच आदेश देण्यात येणार असल्याच कळत असुन दुपारी चार वाजता पिंपळगाव खांड धरणातुन पाणी सुटणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
पाण्यावाचून जनावरे व भाजीपाला पिकांचे नुकसान होत असल्याची भावना शेतकरी वर्गाने व्यक्त करताना व सदर समस्या कानावर घालताच बाबतीत लगेच दखल घेऊन पाणी सोडण्यासाठी तत्परता दाखवल्या बद्दल ग्रामस्थ यांनी माजी मंञी मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांचे आभार व्यक्त केले आहे,
यावेळी माजी प्राचार्य सहदेव चौधरी, लिंगदेवचे सरपंच अमित घोमल, लहीत चे माजी सरपंच भाऊसाहेब चौधरी, अर्जुन गावडे, लहित चे उपसरपंच विवेक चौधरी, बादशहा गायकर, प्रकाश चौधरी, गणेश चौधरी, भाऊसाहेब जाधवविष्णू चौधरी, लिंगदेव सरपंच अमित घोमल, लहीत चे माजी सरपंच भाऊसाहेब चौधरी,माजी सरपंच अर्जुन गावडे, लहित चे उपसरपंच विवेक चौधरी, बादशहा गायकर, प्रकाश चौधरी, गणेश चौ, भाऊसाहेब जाधव,गणेश पवार,ह.भ.प.भाऊसाहेब जाधव,विकास गोडसे,उल्हास गोडसे,भाऊसाहेब फाफळे,रंगनाथ गायकर,कैलास फाफळे, चास सरपंच बाळासाहेब शेळके,बाळासाहेब सावंत,सुनील रंध्ये आदी शंभर शेतकरी यांनी राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड माजी आमदार वैभव पिचड यांच्या निवासस्थानी येऊन आर्जव मागणी केली .
प्रसंगी बोलताना प्रा सहदेव चौधरी म्हणाले लोकप्रतिनिधींनी पिंपळगाव खांड चे आवर्तन सोडण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे व एकाच अवर्तनात दोन अवर्तनाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे वैभव भाऊ आपण हे आवर्तन सोडण्यासाठी सरकार व जलसंपदा विभाग यांना गळ घालावी सरकार आपले आहे .
तर लहीत माजी सरपंच अर्जुन गावडे यांनी अकोले तालुक्यात पाणी अडविण्याचा कार्यक्रम माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व माजी आमदार वैभव पिचड यांनी केला असून तालुक्यात ५०टी एम सी पाणी अडविले जाते ,तालुक्याचे आमदार यांनी पाच वर्षात एक बंधारा बांधला नसून पिंपळगाव खांड जलाशयाचे पाणी नियोजन न करता सोडले जाते त्यामुळे धरणात विस्थापित झालेला शेतकरी पाण्यासाठी वाट पाहतात आज आमची पिके जळून चालली आहेत पिण्याला पाणी नाही याचे सोयरसुतक लोकप्रतिनिधींना नाही.
तर उपसरपंच विवेक चौधरी यांनी माजी मंत्री पिचड साहे ब व माजी आमदार वैभव पिचड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा सचिव,जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून आमचा पाणी प्रश्न सोडविला त्याबद्दल त्यांचे दहा गावचे ग्रामस्थ आभारी आहेत .
प्रसंगी माजी आमदार वैभव पिचड म्हणाले तालुक्यातील पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतकऱ्याला पाणी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे .मी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सवांद साधून पाणी सोडण्याची परवानगी घेतली असून आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिंपळगाव खांड जलाशयातून पाणी सुटणार व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण पुढे असू असे उपस्थितांना आश्वासन देताच उपस्थित शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला तर माजी मंत्री मधुकर पिचड यांनीदेखील शेतकऱ्यांना दिलासा दिला .