ताज्या बातम्या

तिसगाव येथील पोलीस चौकीचा प्रश्न मार्गी

By admin

September 10, 2023

तिसगाव

ahmednagar tisgaon news येथे पोलीस चौकी व्हावी अशी गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिकांची मागणी होती.ही मागणी आता पूर्ण होत आहे.यासाठी तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूल चौकातील जागा निश्चित करण्यात आली असून काही दिवसात या पोलीस चौकीचे उद्घाटन होणार आहे.

पाथर्डी तालुक्यातील मोठे व्यापारी पेठेचे गाव म्हणून तिसगाव ची ओळख आहे.तसेच तिसगाव येथे मराठवाड्यातील बऱ्याच गावातील नागरिकांचा वावर असतो.तसेच तालुक्यातील अनेक नागरिक या ठिकाणी बाजारासाठी येत असतात.याच वृद्धेश्वर हायस्कूल चौकामध्ये जवळच मोठे स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज आहे.त्यामुळे येथे विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी असते.

 

अनेक वेळा मुलींना छेडछाड करण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक मुली भीतीने अशा घटना आपल्या पालकांना पण सांगत नाहीत. यापूर्वी एका माथेफिरू ने बस स्थानकावर मुलींची छेड काढल्याचा प्रकार घडला होता. दोन दिवसापूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाणीचा प्रकार घडला होता. सतत होत असलेल्या गुन्ह्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

तिसगाव मध्ये घडणाऱ्या गुन्ह्यावर आळा बसावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या पोलीस चौकी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मंजूर केली आहे. पाथर्डी येथे शांतता बैठकीमध्ये तिसगाव पोलीस चौकी संदर्भात चर्चा करून, तिसगाव मध्ये जागा उपलब्ध केल्यानंतर लगेच एक पीएसआय व चार कॉन्स्टेबल देण्याची मागणी तिसगावचे सरपंच इलियास शेख सर व जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नंदकुमार लोखंडे यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ मंजूर करून दोन ते तीन दिवसात पोलीस चौकी तिसगाव मध्ये सुरू करण्याचा आश्वासन दिले. यावेळी  पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील माजी ग्रामपंचायत  नंदकुमार लोखंडे यांनी येथे पोलीस चौकी व्हावी यासाठी माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे केली होती.त्यानंतर आता ही मागणी पूर्ण होताना दिसत आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मिरी रस्त्यावरील लोकमान्य पतसंस्थेच्या शेजारी ही चौकी उभारली जात आहे .