ताज्या बातम्या

पेमराज सारडा महाविद्यालयाचा प्रथम आदर्श प्राचार्य पुरस्काराचे दिमाखदार समारंभात वितरण

By admin

September 07, 2023

Ahmednagar sarda college award पेमराज सारडा महाविद्यालयाचा प्रथम आदर्श प्राचार्य पुरस्काराचे दिमाखदार समारंभात वितरण

अहमदनगर

Ahmednagar sarda college award येथील  पेमराज सारडा महाविद्यालयाच्या वतीने यावर्षी पासून सुरु करण्यात आलेल्या ‘स्व. प्राचार्य एस. एम. कुलकर्णी’ आदर्श प्राचार्य पुरस्कार कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.माउली सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक होते. यावेळी संस्थेचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अॅड.अनंत फडणीस, पुरस्कार समितीचे सदस्य  प्रा. रवींद्र शिंगणापूरकर, प्रा.मकरंद खेर, मधुसूदन सारडा, प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले की, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील नव्या योजने नुसार शिक्षण घेताना विद्यार्थ्याचे चांगले चारित्र्य निर्माण होण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. चांगले चारित्र्य निर्माण होण्यासाठी विचार, आचार व प्रचार यावर लक्ष देणे आवश्यक आहे. हिंद सेवा मंडळाने आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये या त्रिसूत्री वर भर द्यावा व भारताचा आदर्श नागरिक या संस्थेतून कसा घडेल याकडे लक्ष द्यावे, आदर्श प्राचार्य पुरस्कार सुरु करून संस्थेने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. पुरस्कार्थी डॉ.प्रदीप दिघे हे सर्व समावेशक असल्याने उचित व्यक्तीला पुरस्कार दिला गेल्याचा मनस्वी आनंद होत आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.

यावेळी कुलगुरू गोसावी पुढे म्हणाले, जेव्हा मोठा पुरस्कार दिला जातो तेव्हा तो जबाबदारी, स्पुर्ती वाढवणारा व अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा असतो. शताब्दी वर्ष साजरे करणारे हिंद सेवा मंडळ ही उच्च संस्था असून शैक्षणिक क्षेत्रात वगळे काम करत आहे.  नव्या शैक्षणिक धोरणाची धुरा संस्थेने सांभाळलेली आहे. आदर्श प्राचार्य पुरस्काराची निवड करणात प्राचार्य प्रदीप दिघे यांनी केलेले चांगले कामे लक्षात आले. पहिला आदर्श प्राचार्य पुरस्कार हा इतिहास लिहिला जाणारा असल्याने हा पुरस्कार मिळाल्यावर प्राचार्य दिघे यांनी इतर प्रचार्यांमध्ये नवा आदर्श निर्माण करावा.

प्रा.शिरीष मोडक म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयाच्या वाटचालीतील अनमोल क्षण म्हणजे हा आदर्श प्राचार्य पुरस्कार वितरण समारंभ आहे. गिरीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या पुरस्काराच्या उपक्रमास सुरवात झली आहे. जेव्हा पुणे विद्यापीठ व हिंद सेवा मंडळ ही नावाजलेली संस्था एकत्र येत हा पुरस्कार दिला जाती तो अत्यंत मानाचा पुरस्कात ठरतो.

<span;>पुरस्कारार्थी डॉ.प्रदीप दिघे म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयाने दिलेला आदर्श प्राचार्य पुरस्कार हा पुढे जाण्यासाठी स्फूर्ती देणारा आहे. या पुरस्काराच्या मिळालेल्या रक्कमेतून ११ हजार रुपये मी सारडा महाविद्यालयास पुस्तके खरेदीसाठी देणगी देत आहे. असे घोषीत करून प्राचार्य माहेश्वरी गावित यांच्याकडे ११ हजाराचा धनादेश सुपूर्द केला व सर्वांचे आभार मानले.

यावेळी  सिनेट सदस्य प्रा. रवींद्र शिंगणापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष अनंत फडणीस यांनी केले. स्वागत अनंत देसाई यांनी केले. प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यांनी आभार मानले. प्रा.प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.<span;>जेष्ठ मार्गदर्शक अजित बोरा व ब्रिजलाल सारडा, सुमतिलाल कोठारी, समन्वयक अनंत देसाई, प्रा.सुजित बेडेकर, प्रा.ज्योती कुलकर्णी, जगदीश झालानी, रणजीत श्रीगोड, मिलिंद कुलकर्णी, प्रा.गिरीश कुलकर्णी, रा.स्व.संघाचे रवींद्र मुळे, प्रबंधक अशोक असेरी, प्रा.मधुसूदन मुळे, संजय चोपडा, अनिल देशपांडे, दिलीप शहा आदींसह मोठ्या संख्यने विविध क्षेत्रातिल नागरिक व कुलकर्णी परिवारातील सदस्य उपस्थित होते.