ahmednagar news today भरधाव वेगात गाडीवर जायचे आणि रस्त्यात दिसणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने उडवायचे असा त्यांचा धंदा. यासाठी ते स्कर्पिओ गाडीचे वापर करत असे. याचा वापर करून ते हे दागिने जवळच्या श्रीरामपूर येथे विकायचे अशा प्रकारचा त्यांचा धंदा. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना जेरबंद केले आहे.
या टोळीने कोपरगांव, शिर्डी, लोणी व संगमनेर परिसरात साथीदारासह चैन स्नॅचिंग गुन्हे केले आहेत. ahmednagar news यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषेदत ही माहिती दिली.
या टोळीचा शिर्डी भागात येणाऱ्या भाविकांच्या गळ्यातील चेन लुटण्याचा धंदा होता, कर्नाटक येथील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याने या महिलेच्या फिर्यादीनुसार तपास सुरु झाला.
फिर्यादी श्रीमती. नागरत्नम्मा डोडय्य, वय 44, रा. हुसदुर्गा, जिल्हा चित्रदुर्गा, राज्य कर्नाटक या आडगांव रोड, खंडोबा मंदीरा जवळ, राहाता येथुन त्यांचे कुटूंबियासह श्री. साईबाबा मंदीर, शिर्डी येथे दर्शनासाठी रस्त्याने पायी जात असतांना पल्सर मोटार सायकलवर अनोळखी दोन इसम येवुन, मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळ्यातील मंगळसुत्र ओढुन तोडून बळजबरीने चोरुन नेले होते.
कांदा अनुदानाची ही अट रद्द करा
घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या कडे सोपविला .स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगांव, शिर्डी shirdi crime परिसरात फिरुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरी करणारा आरोपी नामे सोमनाथ चोभे हा कोळपेवाडी, ता. कोपरगांव येथे त्यांचे राहते घरी सापळा लावुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
सोमनाथ मधुकर चोभे वय 33, मुळ रा. अशोक नगर, ता. श्रीरामपूर हल्ली रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव याकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्याने कोपरगांव, शिर्डी, लोणी व संगमनेर परिसरात साथीदारासह चैन स्नॅचिंग गुन्हे केले असुन सदर गुन्हे करण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीचा वापर करुन गुन्ह्यातील चोरी केलेले सोने त्यांचे साथीदारांकडे असले बाबत माहिती दिली.
त्यांचे इतर साथीदारांची नाव व पत्ते विचारले असता त्याने त्यांची नावे सिध्दार्थ बारसे मुळ रा. अशोक नगर, ता. श्रीरामपूर नाना चव्हाण रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव असे असल्याचे सांगितल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले .
याच गुन्ह्यातील चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी दोन इसम कोपरगांव ते कोळपेवाडी रोडवर येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर दिनेश आहेर यांनी पथकास पाठवून या दोन संशयीत इसम यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले .
त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात सोन्याचे दागिने व दोन मोटार सायकल मिळुन आल्या त्याबाबत ताब्यातील संशयीतांकडे विचारपुस करता त्यांनी कोपरगांव, शिर्डी, लोणी व संगमनेर परिसरात चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आणल्याचे माहिती दिली. त्यांचेवर चार गुन्हे असल्याचे उघडकीस आले आहेत.
त्यांच्यावर 1. लोणी येथे 508/2022 भादविक 392, 34 कोपरगांव शहर येथे 117/2023 भादविक 392 शिर्डी येथे 179/2023 भादविक 394, 34
संगमनेर शहर येथे 208/2023 भादविक 392, 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. या चार गुन्ह्यात चोरीस गेलेले 7,92,000/- 13.2 ग्रॅम (132 ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने, 6,00,000/- रुपये किंमतीची स्कॉर्पिओ, 4,50,000/- रुपये किंमतीच्या सुझूकी आपाच्या दोन मोटार सायकल असा एकुण 18,42,000/- (आठरा लाख बेचाळीस हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांना लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 508/2022 भादविक 392, 34 या गुन्ह्यात पुढील कायदेशिर कारवाई करीता वर्ग करण्यात आले.
आरोपी नामे सोमनाथ मधुकर चोभे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, पुणे व नाशिक जिल्ह्यात मोक्का, दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी व विनयभंग असे गंभीर स्वरुपाचे एकुण -25 गुन्हे दाखल असुन त्यापैकी चार गुन्ह्यात फरार आहे. ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम 1. नाशिक रोड, नाशिक 283/2014 भादविक 392, 34 2. आदर्शनगर, राज्य कर्नाटक 33/2016 भादविक 399, 402 3. उपनगर, जिल्हा नाशिक 290/2016 भादविक 392, 34 4. तोफखाना, अहमदनगर 286/2017 भादविक 395 5. तोफखाना, अहमदनगर 296/2017 भादविक 395 6. तोफखाना, अहमदनगर 301/2017 भादविक 395 7. तोफखाना, अहमदनगर 530/2017 भादविक 392, 34 8. राहुरी, अहमदनगर 80/2017 भादविक 399, 402 (फरार) 9. श्रीरामपूर शहर, अहमदनगर 281/2018 भादविक 392, 34 10. श्रीरामपूर शहर, अहमदनगर 824/2018 आर्म ऍ़क्ट 3/25 11. एमआयडीसी भोसरी, जिल्हा पुणे 64/2018 भादविक 392, 34 12. देहुरोड, जिल्हा पुणे 35/2018 भादविक 392 13. निगडी, जिल्हा पुणे 36/2018 भादविक 392,34 14. निगडी, जिल्हा पुणे 834/2018 भादविक 392, 34 15. हिंजवडी, जिल्हा पुणे 239/2018 भादविक 392, 34 16. हिंजवडी, जिल्हा पुणे 282/2018 भादविक 392,34 17. येरवडा, जिल्हापुणे 608/2018 भादविक 392, 34 18. तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे 17/2018 भादविक 399,402,414,120(ब) ,109 (मोक्का) 19. उपनगर, जिल्हा नाशिक 406/2018 भादविक 392, 34 20. संगमनेर शहर, अहमदनगर 137/2018 भादविक 392, 34 21. तोफखाना, अहमदनगर 291/2018 भादविक 395 22. मार्केटयार्ड, 32/2018 भादविक 392, 34 23. लोणी, अहमदनगर 508/2022 भादविक 392, 34 (फरार) 24. शिर्डी, अहमदनगर 179/2022 भादविक 392, 34 (फरार) 25. कोपरगांव तालुका, अहमदनगर 43/2023 भादविक 452, 354, 324, 323, 504, 506, 34 सह अजाज/नाहसं (फरार)
आरोपी नामे सिध्दार्थ रमेश बारसे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द कर्नाटक व गोवा राज्यात दरोडा, दरोडा तयारी, असे गंभीर स्वरुपाचे एकुण -03 गुन्हे दाखल असुन त्यापैकी तीन गुन्ह्यात फरार आहे. ते खालील प्रमाणे अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. आदर्शनगर, राज्य कर्नाटक 33/2016 भादविक 399, 402 2. यादगीर, राज्य कर्नाटक 40/2016 भादविक 395 3. पणजी, राज्य गोवा 80/2016 भादविक 395, 120(ब), 427, 342 4. श्रीरामपूर शहर, अहमदनगर 365/2018 भादविक 392, 308, 34
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर श्रीमती. स्वाती भोर मॅडम,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव शिर्डी विभाग व अतिरिक्त प्रभार संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.