अहमदनगर
Ahmednagar news मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी आणि साहित्यिक उपक्रमांनी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
या साहित्य संमेलनाचे आयोजन अक्तीव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. यामध्ये राज्यातील शिक्षक सहभागी झाले होते.
सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. टाळ ,लेझीम आणि झांज पथकाच्या वाद्याच्या गजरात ही दिंडी काढण्यात आली.
त्यानंतर आयोजित उद्घाटन कार्यक्रमात बोलताना संमेलनाध्यक्ष किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी कोरोना काळातील शिक्षणाचे फायदे तोटे समजावून घेऊन त्यातून शिक्षणासाठी फायद्याच्या शोध घेणे हे शिक्षकांसाठी आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, राज्य संयोजक विक्रम अडसूळ, स्वागताध्यक्ष नारायण मंगलारम आदि उपस्थित होते. यावेळी कोरोना काळातील शिक्षण यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला,यामध्ये गडचिरोली येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक खुर्शीद शेख,बीडचे चंद्रशेखर फुटके तुकाराम अडसूळ आदि सहभागी झाले होते.
यामध्ये आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि अनोखे उपक्रम यांचा उहापोह करण्यात आला.यावेळी आपले अनुभव व्यक्त करताना खुर्शीद शेख म्हणाले कि, गडचिरोली सारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन व्यवस्था नसल्याने घरोघरी जाऊन शिक्षण घेण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले. जंगलात जाऊन मुलांना शिकवून जंगल क्लास सुरु केले.
एकवीस वर्षांनी एकत्र आलेल्या वर्गमित्रांचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न
यासाठी स्थानिक भाषेचा वापर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे चे मनोहर जाधव हे होते.