अहमदनगर
Ahmednagar loksabha devendra fadanvis जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी पश्चिम वाहिनीचे वाहून जाणारी पाणी पश्चिम महाराष्ट्राचा मराठवाड्यात वळवण्यासाठी 4000 कोटी रुपयांची कृष्णा फ्लड डायव्हर्जंट योजना करण्यात येणार असल्याचे भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसस यांनी सांगितले.
त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात दोन सभा घेतल्या.शिर्डी मतदारसंघातील कोपरगाव येथे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ जामखेड येथे सभा घेतली.
यावेळी माजी मंत्री राम शिंदे,विधान परिषद सदस्य सुरेश धस,माजी आमदार भीमराव धोंडे,उमेदवार सुजय विखे व्यासपीठावर उपस्थित होते.
जामखेड येथे आयोजित सभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील बंद पडलेले सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोदींनी तीस हजार कोटी रुपये दिले असून यातून निळवंडे सारखी योजना पूर्ण झाली आहे.पश्चिम वाहिनीचे वाहून जाणारे पाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यासाठी वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कामाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेस सरकारच्या काळात सहकारी कारखान्यांना काँग्रेस सरकारने इन्कम टॅक्सच्या नोटिसा काढल्या होत्या.मात्र मोदी सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आणि सहकारी साखर कारखान्याच्या हिताचा निर्णय घेऊन कायदा बदलून दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स रद्द करण्याची धोरण राबवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता सर्व प्रादेशिक पक्षांना दुकान बंद करण्याची वेळ आली आहे.तसेच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला प्रचाराला आणण्याची वेळ यांच्यावर आली असून यांना अजमल कसाब जवळचा वाटत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.