Ahmednagar kusti: वाडिया पार्क येथे होणाऱ्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धासाठी जिल्हा तालिम संघाचे उपाध्यक्ष युवराज पठारे यांनी कै. छबुराव लांडगे यांच्या स्मरणार्थ अडीच किलो वजनाची प्रथम मानाची गदा दिलेली आहे.
याच स्पर्धेतील महिलांच्या 65 किलो वजन गटातील विजेत्यांसाठी कै.शकूर पहिलवान यांच्या स्मरणार्थ एक किलो वजनाची गदा अनिस चुडीवाल यांनी दिली आहे , अशी माहिती जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पहिलवान वैभव लांडगे व स्वागताध्यक्ष किरण काळे यांनी दिली.
येत्या दोन दिवसात अहमदनगर येथील वाडिया पार्क मैदानात कुस्त्यांचा थरार पहावयास मिळणार आहे. त्यासाठी राज्यातील नामवंत मल्ल हजेरी लावणार आहेत.
महिलांचे आखाडे इथे रंगणार असून अकराशे हून अधिक मल्ल सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.
तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे म्हणाले की , कै. छबुराव लांडगे यांनी नगरचे नाव कुस्तीच्या रुपाने कानाकोपर्यात पोहचवले आहेत.
दिव्या पुजारी ची भारतीय शुटींगबॉल संघाची कर्णधारपदी निवड
दरम्यान , या कुस्ती स्पर्धेची नियोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. या तयारीची पहाणी करण्यासाठी कुस्तीगिर संघटनेचे पदाधिकारी बुधवार (ता. 25) सायंकाळी पाहणी करण्यासाठी येत आहेत.
या स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. २६ मेला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत वजने व मेडिकल तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी सर्व गटातील चार ते आठ वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा होणार आहे.
Ahmednagar kusti : २६ पासून रंगणार थरार
२७ मेला सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा होणार आहे.
२८ मेला सकाळी आठ ते अकरा व संध्याकाळी पाच ते सात सर्व गटातील अंतिम लढती होणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
सर्व बक्षिसाची रक्कम कुस्ती स्पर्धेतील सर्व बक्षीसे व सर्व महिला खेळाडूंची निवास व्यवस्था ही या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
तसेच जिल्हा तालिम संघातर्फे पंच व मैदानाची सर्व जबाबदारी सर्व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकार्यांवर स्वागताध्यक्ष किरण काळे यांनी सोपावली आहे.
ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद , अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे सर्व पदाधिकारी व किरण काळे युथ फाउंडेशनचे सर्व सहकारी रात्रंदिवस कष्ट घेत आहेत ,
अशी माहिती अहमदनगर शहर तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव लंगोटे , पहिलवान विलास चव्हाण , खजिनदार नानासाहेब डोंगरे , मोहन हिरणवाळे , सुनील भिंगारे आदींनी माहिती दिली.
ipl 2022 closing ceremony इथे होणार ipl चा फायनल सामना