ताज्या बातम्या

आरक्षणाच्या समर्थनार्थ अहमदनगर जिल्हा बंद

By admin

September 23, 2024

अहमदनगर

अखंड मराठा समाज अहमदनगर च्या वतीने उद्या २३ ऑक्टोबर रोजी जिल्हा बंद ची हाक देण्यात आली आहे . या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणी साठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरवात केली आहे.

त्या उपोषणाला अहमदनगर शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला असून नगर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. मागील सात दिवसान पासून सुरू असलेल्या उपोषणा संदर्भात सरकार कुठल्या ही प्रकारे सकारात्मक भूमिका घेताना दिसत नसल्याची भावना मराठा समाजा ची झाली आहे.

मराठा समाजाच्या प्रमुख मागणी कडे सरकारचे लक्ष वेधण्या साठी उद्या जिल्हा बंद ची भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये तसेच नागरिकांनी सुद्धा आपली आस्थापन बंद ठेवावीत असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.