नगर,
ahmednagar crime with gavathi katta नगर येथील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी धीरज जोशी यांच्यावर शनिवारी रात्री त्यांच्या घराच्या जवळच गुलमोहर रस्त्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी दोन हल्लेखोर पळून गेले. त्यांच्या जवळ असलेले गावठी कट्टा आणि तलवार घटनास्थळी पोलिसांना आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच नगरचे आमदार संग्राम जगताप ( sangram jagtap) यांनी दवाखान्यात जाऊन जोशी यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना जगताप यांनी पोलिसांच्या कारवाया वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस गुन्हेगारांची थातूर मातुर चौकशी करून सोडून देत आहेत. जिल्ह्यात हे शस्त्रे येतात कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला .
गेल्या आठवड्यात राहुरी येथे वकील दाम्पत्याची हत्या करण्यात आली . त्यानंतर शनिवारी शहरात बन्सी महाराज (bansi maharaj mithai ahmednagar) या प्रसिद्ध मिठाई दुकानाचे चालक धीरज जोशी यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला नेमका कोणत्या हेतूने झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र घटनास्थळी एक गावठी कट्टा आणि तलवार आढळून आली .
त्यामुळे आता या बाबत मोठा आरोप पोलिसांवर (ahmednagar police) आमदार जगताप यांनी केला आहे . या संदर्भात त्यांनी या घटनेचा निषेध केला असून ,शस्त्रांची तस्करी करणार्यांवर थातूर मातुर कारवाई केली जाते तआणि त्यांना सोडून दिले जाते, तसेच या कारवाया संदर्भात थेट मुळाशी न जाता किरकोळ कारवाई होते . असा आरोप त्यांनी केला आहे . राज्यातही गोळीबाराच्या घटना घडल्या असून याबाबत आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले .
दरम्यान या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे .