अहिल्यानगर
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांचा ‘वाटा संघर्षाच्या’ हा गौरव ग्रंथ, तुम्हा आम्हा सर्वांच्या पिढीचा संघर्ष नेमकेपणाने मांडणारा दस्तऐवज आणि आपलं जगणं बुलंद होण्यासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, माजी आ लहू कानडे यांनी केले.
अहिल्यानगर येथील कल्याण रोड वरील जाधव लॉन्स येथे शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या ‘वाटा संघर्षाच्या’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अहिल्यानगरचे आ. संग्रामभैय्या जगताप, नगरसेवक संपतदादा बारस्कर, अध्यक्ष राजेंद्र उदागे, सौ. मिरा उदागे, डॉ. संजय कळमकर, प्रा. डॉ.सुधाकर शेलार, प्रा.डॉ. संदीप सांगळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. बाबा आरगडे, प्रा. मधुसूदन मुळे, जयंत येलुलकर, नगरसेविका मयुरीताई जाधव, बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोकराव पडघन, जयंत जाधव, उद्योजक भारत सातपुते, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, शब्दगंधचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत आदी मान्यवर यावेळी विचारपिठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. आ. लहू कानडे म्हणाले की, कोणतीही दिशा नसलेल्या पाथर्डी तालुक्यातील सुसरे या एका खेडेगावातील दुष्काळग्रस्त भागातील मुलगा नगरला येऊन स्वतःची एक वेगळी दुनिया उभी करतो, ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. या गौरव ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या भूतकाळाबद्दल अत्यंत विलक्षण गोष्टी नेमकेपणाने नोंदवल्या आहेत. शब्दगंधने परिवर्तनवादी विचारांची शिदोरी देणारे मित्र आपुलकीच्या भावनेतून नेहमीच जपले आणि त्यांच्या सर्जनशीलतेला पाठबळ देण्याचे काम केले. राजेंद्र उदागे हा माणूस कुठल्याही विचारवंतापेक्षा कमी नाही असे ते म्हणाले.
आ. संग्रामभैय्या जगताप म्हणाले की, राजेंद्र उदागे यांचा ‘वाटा संघर्षाचा’ हा गौरव ग्रंथ साहित्यिक व उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांनी खेडेगावातून नगरला येऊन स्वतःचा चांगला व्यवसाय उभा केला. स्वतःची जबाबदारी नीटपणे सांभाळली आणि शेकडो हातांना रोजगार उपलब्ध करून दिला. सातत्याने सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या कार्यकाळात शब्दगंध साहित्यिक परिषदेला एक वेगळी उंची मिळाली आहे. साहित्य क्षेत्रात शब्दगंध साहित्यिक परिषदेचा दबदबा निर्माण झाला आहे.
‘वाटा संघर्षाच्या’ हा प्रेरणादायी गौरवग्रंथ :- मा. आ. लहू कानडे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भोसले म्हणाले की, आपल्या जीवनाची वाटचाल कशी करावी हे राजाभाऊ कडून शिकावं. नवोदित साहित्यिकांबरोबरच उद्योग क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या लघु उद्योजकांनाही राजाभाऊंचा गौरव ग्रंथ हा प्रेरणास्त्रोत ठरणारा आहे.
यावेळी साहित्यिक डॉ. संजय कळमकर, प्रा. डॉ. सुधाकर शेलार, प्रा. डॉ. संदीप सांगळे, ज्ञानदेव पांडुळे, अशोकराव पडघन, प्रा. मधुसूदन मुळे, बाळासाहेब बोठे, जयंत येलुलकर यांचीही भाषणे झाली. शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार भगवान राऊत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शर्मिला गोसावी व उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले, तर अमोल उदागे यांनी आभार मानले.
यावेळी कवी चंद्रकांत पालवे, जालिंदर बोरुडे, गणेश भगत, डॉ. नवनाथ वावळ, एस एम.मिर्झा, प्रा. भगवान सांगळे, एल बी जाधव, नंदकुमार ओहोळ, डॉ. सूर्यकांत वरकड, विठ्ठल लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रकाशन समारंभापूर्वी शाहीर भारत गाडेकर, शाहीर वसंत डंबाळे, शाहीर हौशीनाथ बोर्डे, प्रशांत सूर्यवंशी, दादू साळवे, मनीष वाघेला, विजय साळवे यांनी शाहिरी जलसा हा बहारदार कार्यक्रम सादर केला. भगवान राऊत यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
नवजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी राजेंद्र उदागे यांना सन्मानपत्र प्रदान केले. जिल्ह्यातील विविध संस्था व व्यक्तींच्या वतीने राजेंद्र उदागे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीनिवास बोजा, डॉ.जी.पी.ढाकणे, सुभाष सोनवणे, संदीप रोडे, डॉ.अनिल गर्जे, प्रा.डॉ.किशोर धनवटे, भगवान राऊत,
शाहीर भारत गाडेकर, बबनराव गिरी, रवींद्र दानापुरे, शर्मिला गोसावी, राजेंद्र चोभे, प्रा.डॉ.अशोक कानडे, प्रशांत सूर्यवंशी, स्वाती ठुबे, शहाराम आगळे, भारत आरगडे, जयश्री झरेकर, हरिभाऊ नजन, बाळासाहेब शेदूरकर, मकरंद घोडके, शर्मिला रूपटक्के, प्रा. डॉ. किशोर धनवटे, दिगंबर गोंधळी, विजय साळवे, हौसिनाथ बोर्डे, प्रमोद येवले, संतोष कानडे, डॉ. रमेश वाघमारे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, ऋषिकेश राऊत, निखिल गिरी, दिशा गोसावी, भाग्यश्री राऊत, हर्षाली गिरी यांनी परिश्रम घेतले.