agriculture forms for farmer

कृषीविषयक

या अटीवर शेतकरीही लढवू शकतात निवडणूक

By admin

March 29, 2023

 

कडा,

एखाद्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज agriculture forms for farmer भरताना तुमचे नाव मतदार यादीत असायला हवे. ही अट सर्वांना लागू असते.ही अट सर्वांसाठी लागू असते .मग ती ग्रामपंचायत निवडणूक असो वा इतर कुठली समाजिक संस्थेची असो. पण शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढण्यासाठी मतदार यादीतील नावाची सुट मिळाली आहे.

ती कशी मिळाली सुट आणि काय आहे नियम

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीसाठी आता शेतकऱ्यांना देखील थेट उमेदवारी अर्ज forms agriculture for farmer दाखल करता येणार आहे.  विशेष म्हणजे शेतकऱ्याचे मतदार यादीत नाव नसले तरी तो सेवा सहकारी सोसायटी आणि ग्रामपंचायत अशा दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर कापूस cotton दरात वाढ

याबाबत माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी बी जे शिंदे यांनी सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवा सहकारी सोसायटी आणि ग्रामपंचायत या दोन्ही मतदारसंघातून शेतकरी असलेली व्यक्ती निवडणूक लढू शकणार आहे .  त्यासाठी दोन अटी farmers eligibility verification from आहेत एक म्हणजे त्याच्याकडे तहसीलदारांच्या सहीचे शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असायला हवे आणि दुसरी अट म्हणजे मतदार यादीत जर त्याचे नाव नसेल तर त्याच्या नावासाठी तो ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे  तेथील मतदार त्याचा सूचक आणि अनुमोदक सूचक असायला हवा. एकूणच शेतकऱ्याला स्वतःचे मतदान नसले तरी ही निवडणूक लढवण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. त्यामुळे मर्यादित उमेदवार असलेली निवडणूक शेतकऱ्यांमुळे रंगतदार होणार आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत्यांची krushi utpanna bazar samiti

निवडणूक सरकारने जाहीर केल्या आहेत. या नवीन नियमामुळे शेतकऱ्यांचा थेट संबंध असलेल्या या संस्थेच्या संचालक मंडळात जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून  सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.  संचालक मंडळाच्या एकूण १८ जागा असून त्यातील सेवा सहकारी सोसायटी मतदार संघाच्या ११ आणि ग्रामपंचायत मतदार संघाच्या ४ अशा एकूण पंधरा पैकी कोणत्याही जागेवर शेतकरी असलेली व्यक्ती  ( महिला किंवा पुरुष )  निवडणूक लढवू शकणार आहे .