agriculture drones

कृषीविषयक

शेतीपूरक व्यवसायाची नवीन संधी ! जाणून घ्या काय आहे ?

By admin

April 01, 2023

 

शेतकऱ्यांना शेती सुलभ व्हावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळते. आणि व्यवसायाच्या नवीन संधी पण मिळत आहेत.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून हवामान अद्ययावत शेती व पाणी व्यवस्थापन केंद्रामध्ये agriculture drones वापरावर प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.

हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आले आहे. या मध्ये दोन्ही व्यवसायिक हेतू ठेवण्यात आले आहेत. drones for agriculture मध्ये शेतकऱ्यांना विकसित तंत्रज्ञानाची माहिती देणे आणी त्याचा जास्तीत जास्त वापर करून कमी खर्चात आणि वेळेची बचत करत काम झाले पाहिजे हा उद्देश ठेवण्यात आला आहे.

शेती मध्ये फवारणी करण्यासाठी agriculture drones spraying चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काही मिनिटामध्ये बांधावरून फवारणी केली जाते. शेतात जाऊन फवारणीचे अनेक तोटे शेतकऱ्यांना होत आहेत. आता हे नवीन तंत्रज्ञान आल्याने शेतकऱ्यांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे.

राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे  agriculture drone training in Maharashtra प्रसिद्ध होत आहे.शेतकऱयांना ह्या  drones बद्दलची माहिती उपलब्ध व्हावे यासाठी mpkv मध्ये हे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

 

कसा घ्यावा agriculture drones साठी प्रवेश

शेतीमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमधील काम सोपे करण्याच्या दृष्टीने हे एक पाउल म्हणावे लागेल .drones remote pilot प्रशिक्षणामुळे युवा पिढीला कृषि क्षेत्रात नविन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.देशात अशा प्रकारचे ड्रोन पायलट प्रशिक्षण देणाऱ्या ३१ संस्था असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे राज्यातील एकमेव आहे. सलग ७ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात प्रत्यक्ष ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि भारत सरकारचे पारपत्र ( indian passport )असलेल्या कोणत्याही १८ ते ६५ वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस सहभागी होता येणार आहे.त्यासाठी 65 हजार रुपये फी आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करण्याऱ्या व्यक्तीस नागरी विमान उड्डान महासंचालनालय ड्रोन उडविण्याचा परवाना मिळणार आहे.

या द्वारे तो व्यक्ती व्यावसायिक तत्वावर ड्रोन व्यवसाय करू शकतो . या प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती स्वत:चा ड्रोन खरेदी करून शेतकऱ्यांना सेवा उपलब्ध करून देऊ शकतो.

drone farming साठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने ड्रोन नियम 2021 प्रसिद्ध केले आहेत.

या नियमावलीनुसार ड्रोन चालवण्यासाठी ड्रोन पायलट परवाना आवश्यक असतो. हा परवाना नागरी विमान वाहतूक संचालनालयाने अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण  agricultural drone pilot training संस्थेकडून घ्यावा लागतो. त्यासाठी आता महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीला अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी नागरी विमान उड्डाण महासंचालनालय भारत सरकार, नवी दिल्ली dgca approved drone training institute या कार्यालयाने मान्यता दिली आहे.

कृषि संशोधन केंद्र चास येथील ड्रोन उड्डान क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. सुविधांची पडताळणी करुन विमान वाहतुक संचालनालयाने महात्मा फुले कृषि विद्यापीठात ड्रोन पायलट drone pilot training near me प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेसाठी मंजुरी दिली आहे.

agriculture drone training in Maharashtra  भारतातील कृषि विद्यापीठातील पहिले व एकमेव केंद्र .

कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेसाठी लागणार्‍या सर्व बाबीसाठी विद्यापीठ सदैव मदत करेल असे आश्वासन दिले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाला मंजूर झालेले अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र drone pilot training centre हे भारतातील कृषि विद्यापीठातील पहिले व एकमेव केंद्र आहे.

या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेसाठी ग्राउंडझीरो  एरोस्पेस, मुंबई यांच्याशी विद्यापीठाने करार केला असून ते ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी मदत करणार आहेत.

कृषि यंत्र व शक्ती विभागाचे विभाग प्रमुख तथा कास्ट प्रकल्पाचे सदस्य डॉ. सचिन नलावडे, ग्राउंडझीरो एरोस्पेस, मुंबईचे श्री. राहुल आंबेगावकर व ध्रिती शाह, कास्ट प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. गिरीषकुमार भणगे व तांत्रीक सहाय्यक इं. नीलकंठ मोरे हे इथे मार्गदर्शन करत आहेत.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेच्या मान्यतेचा कालावधी 10 वर्षे  असून मुख्य कार्यालय महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राहिल. ड्रोन उड्डाण प्रक्षेत्र व प्रशिक्षण स्थळ हे कृषि संशोधन केंद्र, चास, जि. पुणे येथे असणार आहे.

नागरी विमान उड्डाण महासंचालनालय या कार्यालयाने निश्चित करून दिलेला रिमोट पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविणे, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी पायलटचे मूल्यमापन करणे, अधिकृत रिमोट पायलट प्रमाणपत्र drone certification course बहाल करणे ही या रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्य आहेत.

या प्रशिक्षणासाठी drone pilot training qualification पात्रता 10 वी पास असून भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे अशी माहिती अकाउंटेबल मॅनेजर व प्रमुख संशोधक डॉ. सचिन नलावडे drone pilot training contact (संपर्क क्रमांक 9422382049) यांनी दिली.

शेतीमधील ड्रोनची गरज ओळखून, त्यासाठी चांगले प्रशिक्षत ड्रोन पायलट ग्रामीण भागात तयार झाले तर गावातील तरुणांना ड्रोन हे एक उत्तम रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. नेमक्या याच भावनेने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येत आहे. या केंद्राद्वारे सर्व अहर्ता प्राप्त इच्छुकांना ड्रोन पायलट बनण्याची संधी उपलब्ध होणार आहे.