agribusiness

ताज्या बातम्या

शेतकरी मुलाशी विवाहासाठी या गावाने सुरु केली योजना

By admin

March 30, 2023

 

संगमनेर

agribusiness करणाऱ्या शेतकरी तरुणाशी  विवाह करायचा म्हटलं तर सगळेच मुली नाक मुरडतात. मग अशा वेळी या लग्नाळू तरुणांशी  लग्न करण्यास कोण तयार होणार?

यावर या गावच्या सरपंचांनी नामी युक्ती शोधून काढली आहे.राज्य सरकार जसं शेतकऱ्यांसाठी agriculture business  आणि इतरांसाठी विविध सरकारी योजना जाहीर करतात .त्याप्रमाणे या गावातल्या सरपंचांनी चक्क शेतकरी मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला संसार उपयोगी वस्तू भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या योजनेला ‘शेतकरी अर्धांगिनी योजना’ असे नाव दिले आहे.

कृषी पंपाची थकबाकी भरताय का ? थांबा हे वाचा

agribusiness कुठे केला हा उपक्रम सुरू?

ग्रामीण भागात शेती असणाऱ्या लग्नाळू युवकांना कोणीच पोरी द्यायला तयार नसतात. शेतकरी युवकाशी विवाह करण्यास मुलीही नकार देतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न shetkari marriage problem थांबले आहे. ही स्थिती बदलावी यासाठी शेतकरी मुलाशी विवाह करणाऱ्या वधूला स्वखर्चाने शेतकरी अर्धांगिनी योजनेत 5555 रुपयांच्या रोख रकमेसह संसार उपयोगी वस्तू देण्याचा निर्णय marriage problem solution संगमनेर तालुक्यातील दरेवाडी चे सरपंच आनंदा दरगुडे यांनी घेतला आहे.

ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण वाढते वाटते आहे. मात्र त्याचबरोबर या शिकलेल्या मुली शेतकरी मुलांबरोबर लग्न करण्यास मात्र ना पसंती दर्शवितात.त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी मुले लग्नाळू आहेत.

शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा तसेच शेतीकरणाऱ्या मुलांनाही प्रतिष्ठा निर्माण व्हावी यासाठीचा हा उपक्रम असल्याचे दरगुडे यांनी सांगितले.दरेवाडी गावची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 1012 आहेत .तर गावात 50 ते 60 लग्नाळू मुले आहेत .

पाहूयात कि या निर्णयामुळे किती मुली शेतकरी मुलांशी लग्न करतात, आणि अशा प्रकारच्या योजना सर्व गावात राबवायला हव्यात.

यावर तुमचे मत जरूर नोंदवा